फोटोग्राफी

ब्लॉग : प्रवासवर्णन – अक्कलकोट आणि नळदुर्ग किल्ला – एक दिवसीय ट्रीप

बरेच दिवस झाले अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजाचे दर्शन घ्यायची इच्छा होती पण योग काही येत नव्हता. मग २९ तारखेला उगाच विचार केला की उद्या जाऊ दर्शनाला नंतर कदाचित करोंना तिसरी लाट आली तर काय घ्या. मग लगेच अक्कलकोट निवासी कुबेर करांना ‘गणेश दीवणजी’ फोन लावला. फेसबुक वर कुबेर ग्रुप आहे. तिथे सगळे एकमेकांना मदत करायला तत्पर असतात. दीवणजीनी फोन योग्य ते मार्गदर्शन केले. आम्हाला ११ च्या आत दर्शन घ्यायला सांगीतले. मग काय गुरुवारी पहाटे ५.४५ लाच गाडीने निघालो. आम्हाला ११ च्या पोहचायचे होते पण ड्राईवर ने ९.३० लाच अक्कलकोट टच केले. त्यामुळे दर्शन मजेत, उत्साहात, आणि अतिशय कमी वेळात झाले. हा गुरुवार सुद्धा खासच होता. कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि त्याच दिवशी एकादशी असल्याने आणि वर्षा चा शेवट असल्याने गर्दीचा अंदाज होता. दीवणजी नी स्वामी समाधी मंदिराचे सुद्धा दर्शन घ्यायला सांगीतले. जे की आम्हाला माहितीच नव्हते. तिथे दीवणजी सोबत छान गप्पा रंगल्या. सोबत आणखी एक कुबेर करां सोबत छान गप्पा करत नाष्टा झाला. खरे तर कुबेरकरांचे हॉटेल होते. त्यामुळे छान नाष्टा झाला. मग लगेच दुसऱ्यादा दर्शन घेऊन समाधी दर्शन घेतले आणि नळदुर्ग कडे निघालो.
हन्नूर मार्ग बनत आहे. मार्गा मध्ये कच्चा रस्ता असल्याने वेळ लागत होता. बरोबर १२.१८ ला नळदुर्ग कडे पोहोचलो. आणि नळदुर्ग च्या किल्ल्याची धावती भेट घेतली. नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वात मोठा किल्ला आहे. नळदुर्ग किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यात येत असून सोलापूर पासून 48 किमी वर राष्ट्रीय महामार्गावर आहे. हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता आणि शेवटी मोगला कडे हा किल्ला गेला. मुख्य दरवाजा जवळ जाण्यासाठी वळणाचा रस्ता आहे आणि साध्या कमानीतून प्रवेश आहे. शत्रूला चकवा देण्यासाठी अशी मुख्य दरवाजाची योजना आहे. दरवाजा लाकडी असून त्याला टोकदार खिळे आहेत. हलमुख मुख्य दरवाजातून प्रवेश झाल्यावर समोर हत्तीखाना आहे. प्रवेश झाल्यास नळदुर्ग चा किल्ला किती अजस्त्र आहे ही गोष्ट लक्षात येत नाही. हत्तीखाना च्या वरी मोकळी जागा आहे तिथे लोक फोटो काढत होती मग आमची स्वारी सुद्धा साहजिक तिथे पोहोचली. तिथे लोक घुमटावर चढून फोटो काढत होती. मग आमच्यातील दोघांनी घुमटावर फोटो काढले. सगळा नसला तरी थोडा परिसर दिसत होता. मुख्य रस्त्या सोबत एका साइड ने चालण्याचा रस्ता आणि दुसऱ्या बाजूने ई-रिक्षाला जाण्यासाठी होता. बागांना छान, सुस्थितीत ठेवले आहे. जेवणाची वेळ झाली होती. मग काय घरून आणलेल्या जेवणावर छान झाडाखाली बसून ताव मारला. छोटीशी एक पंगतच केली. बाजूला झाडावर बसलेल्या कोतवाल पक्ष्याचे फोटोसेशन केले. मग ई-रिक्षाने पुढे गेलो.

ब्लॉग : प्रवासवर्णन – अक्कलकोट आणि नळदुर्ग किल्ला – एक दिवसीय ट्रीप Read More »

 ब्लॉग : प्रवासवर्णन – तिरूपती बालाजी दर्शन ट्रीप – दीड दिवसीय ट्रीप

आपण छोटा का होईना प्रवास का करतो? तर प्रवास मध्ये गप्पा टप्पा, सुख दु:खाची चर्चा, विचारपूस, निसर्गाशी संवाद आणि मना वर आलेला मरगळ दूर करण्या साठी करतो. या वर्षी करोना लॉकडाऊन नंतर तिरूपती बालाजी दर्शन करण्याची कुटुंबाची बालाजी दर्शनाला जायची इच्छा होती. पण कोविड मुळे काही जाता येत नव्हते. त्यात मी महाराष्ट्रात, मंदिर आंध्रात आणि मध्ये कर्नाटक, तेलंगणा मधून रस्ता जास्त असल्याने शक्य नव्हते. कारण प्रत्येक राज्याचे वेगवेगळे नियम आणि कधी कोणता नियम अर्ध्या रात्रीत येईल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे कोविड मुळे दर्शन लांबत गेले. आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणल्या प्रमाणे जुलै महिन्यात दर्शन पास तर 5 मिनिटात संपले. इकडे आधार कार्डचा नंबर टाके पर्यंत तर तिकडे तिकिट सुद्धा संपले. हे तर गाजलेल्या मोबाइल फ्लॅश सेल सारखे तिकिटे 5 मिनिटात संपून जात होती. दुसर्‍या प्रकारची तिकिटे होती पण आपल्याला भेटतील याची काही खात्री नव्हती. त्यामुळे आम्ही तिकडे फिरकलोच नाही. २४ ऑगस्टला परत सप्टेंबर महिन्याचे तिकिटे ओपन झाली. आणि ६ जणांचे तिकिट काढे पर्यंत तर ५ मिनिटात संपले सुद्धा. पण बहुतेक कोणाचेही तिकिट न निघाल्या मुळे परत १० मिनिटात तिकिट ओपन झाली. त्यामुळे मी strategy बदलली. एकदाच सगळे तिकिटे काढण्या पेक्ष्या ३-३ लोकांचे तिकिट काढत गेलो आणि त्यातच पूर्ण दिवस गेला. त्यात यश (भाचा) आधार कार्ड नसल्याने त्याला एक ही दर्शन मिळाले नाही. त्या साठी परत पर्यायी दर्शन तिकिटाची व्यवस्था केली. मग त्यात आमचे दुसरे दर्शन, यशचे एक दर्शन यांचा ताळमेळ घालणे नाकी नऊ आले. पण त्याची सुद्धा तयारी झाली. आमचे दुसरे दर्शन तिकिटे सुद्धा लगेच मिळाली. पण यशचे आधार कार्ड काढून दर्शन तिकिट काढायला थोडा वेळ लागला. रेल्वे आणि राहायची सोय या नंतर तिकिट पुराण एकदाचे संपले. रेल्वे, दर्शन, निवास तिकिट काढणे वेळ खाऊ काम होते.

 ब्लॉग : प्रवासवर्णन – तिरूपती बालाजी दर्शन ट्रीप – दीड दिवसीय ट्रीप Read More »