ब्लॉग : प्रवासवर्णन – अक्कलकोट आणि नळदुर्ग किल्ला – एक दिवसीय ट्रीप

बरेच दिवस झाले अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजाचे दर्शन घ्यायची इच्छा होती पण योग काही येत नव्हता. मग २९ तारखेला विचार केला की उद्या जाऊ दर्शनाला. नंतर कदाचित करोना तिसरी लाट आली तर काय घ्या? मग लगेच अक्कलकोट निवासी कुबेर करांना ‘गणेश दीवणजी’ फोन लावला. फेसबुक वर कुबेर ग्रुप आहे. तिथे सगळे एकमेकांना मदत करायला तत्पर असतात. दीवणजीनी फोनवर योग्य ते मार्गदर्शन केले. आम्हाला ११ च्या आत दर्शन घ्यायला सांगीतले. मग काय गुरुवारी पहाटे ५.४५ लाच गाडीने निघालो. आम्हाला ११ च्या आत पोहचायचे होते. पण ड्राईवरने ९.३० लाच अक्कलकोट टच केले. त्यामुळे दर्शन मजेत, उत्साहात, आणि अतिशय कमी वेळात झाले. हा गुरुवार सुद्धा खासच होता. कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि त्याच दिवशी एकादशी असल्याने आणि वर्षाचा शेवट असल्याने गर्दीचा अंदाज होता. दीवणजी नी स्वामी समाधी मंदिराचे सुद्धा दर्शन घ्यायला सांगीतले. जे की आम्हाला माहितीच नव्हते. तिथे दीवणजी सोबत छान गप्पा रंगल्या. आणखी एका कुबेरकरा सोबत छान गप्पा करत नाष्टा झाला. खरे तर कुबेरकरांचे हॉटेल होते. त्यामुळे छान नाष्टा झाला. मग लगेच दुसऱ्यांदा दर्शन घेऊन समाधी दर्शन घेतले आणि नळदुर्ग कडे निघालो.

हन्नूर मार्ग बनत आहे. मार्गा मध्ये कच्चा रस्ता असल्याने वेळ लागत होता. बरोबर १२.१८ ला नळदुर्ग कडे पोहोचलो. आणि नळदुर्ग च्या किल्ल्याची धावती भेट घेतली. नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वात मोठा किल्ला आहे. नळदुर्ग किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यात येत असून सोलापूर पासून 48 किमी वर राष्ट्रीय महामार्गावर आहे. हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता आणि शेवटी मोगला कडे हा किल्ला गेला. मुख्य दरवाजाजवळ जाण्यासाठी वळणाचा रस्ता आहे आणि साध्या कमानीतून प्रवेश आहे. शत्रूला चकवा देण्यासाठी अशी मुख्य दरवाजाची योजना आहे. दरवाजा लाकडी असून त्याला टोकदार खिळे आहेत. हलमुख दरवाजातून प्रवेश झाल्यावर समोर हत्तीखाना आहे. प्रवेश झाल्यास नळदुर्ग चा किल्ला किती अजस्त्र आहे ही गोष्ट लक्षात येत नाही. हत्तीखाना च्या वरी मोकळी जागा आहे तिथे लोक फोटो काढत होती मग आमची स्वारी सुद्धा साहजिक तिथे पोहोचली. तिथे लोक घुमटावर चढून फोटो काढत होती. मग आमच्यातील दोघांनी घुमटावर फोटो काढले. सगळा नसला तरी किल्ल्याचा थोडा परिसर दिसत होता. मुख्य रस्त्या सोबत एका साइड ने चालण्याचा रस्ता आणि दुसऱ्या बाजूने ई-रिक्षाला जाण्यासाठी वाट होती. बागांना छान, सुस्थितीत ठेवले आहे. इथे प्री-वेडिंग फोटो आणि व्हीडियो शूटिंग भरपूर प्रमाणात होते. जेवणाची वेळ झाली होती. मग काय घरून आणलेल्या जेवणावर झाडाखाली बसून छान ताव मारला. छोटीशी पंगतच केली. बाजूला झाडावर बसलेल्या कोतवाल पक्ष्याचे फोटोसेशन केले. मग ई-रिक्षाने पुढे गेलो.

हलमुख दरवाजा
हलमुख दरवाजा तोफ

पहिले बोट राइडला पोहोचलो. मस्त 20 मिनिटे बोट राइड घेतली. 20 मिनिटा नंतर पाय दुखत होते. नर आणि मादी धबधब्याला बाहेरून बघून आलो. बोटिंग संपल्या नंतर चालत  नर आणि मादी धबधबा आतून बघण्यासाठी गेलो. पावसाळ्यात पर्यटणाचे मुख्य आकर्षण नर आणि मादी धबधबाच आहेत. किल्ल्याची रचना जबरदस्त आहे. एका बाजूला वाहणारी बोरी नदी ला अडवून त्यावर धरण बांधून त्याचा किल्ल्याच्या संरक्षणा साथी वापर दुसर्‍या बाजूला पूर्ण तटबंदी. आतल्या बाजूला दुहेरी तटबंदी. त्यामुळे किल्ला कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो कळतच नाही. किल्ल्यात एक बाजूला पठार आणि दुसर्‍या बाजूला बोरी नदीवरील खंदक आहे. त्यावर धरणा सारखी भिंत बांधून पाणी अडवून साठवले आहे. पावसाळ्यात पाणी पातळी वाढताच नर आणि मादी धबधब्यातून पाणी धरणाच्या दुसर्‍या बाजूला पडते. मादी धबधब्यातून हिरव्या रंगाचे पाणी बाहेर पडते आणि नर धबधब्यातून पांढर्‍या रंगाचे पाणी बाहेर पडते. नर आणि मादी धबधब्यांना जवळून बघण्यासाठी आत जलमहाल आहे. तिथे जाण्यासाठी बंधार्‍याच्या  भिंती वरून आत मध्ये पायऱ्या आहेत. जल महालाच्या खिडक्यांना नक्षीदार कोरीव कामाने सजलेल्या आहेत. आत जल महल मध्ये शिलालेख आहे. तिथे असे लिहिलेले आहे की, या जलमहालाकडे दृष्टी टाकल्यास मित्रांचे डोळे प्रसन्नतेने उजळतील तर शत्रूच्या डोळ्यापुढे अंधारी येईल. नर आणि मादी धबधब्याचे दृश्य अतिशय मनमोहक आणि सुंदर असते. त्यामुळे पावसाळा हा किल्ला बघण्याचा मुख्य सीजन आहे असे म्हणायला हरकत नाही. बंधारा बांध बेसॅल्ट दगडाने बांधलेला आहे. आदिलशाह ने हा धरण कम बंधारा बांधलेला आहे. हा बंधारा 20 मीटर उंच आहे.

बोटिंग आणि जल महल बघून बाहेर आल्यानंतर उपळी(टेहळणी) बुरूज बघायला गेलो. एकूण 77 पायऱ्या आहेत. किल्ल्यातील सर्वात उंच जागा. सगळा परिसर येथून दिसतो. किल्ल्याच्या बाजूने हायवे जातो. या बुरूजा वर 2 मोठ्या अजस्त्र तोफा आहेत. एका तोफेचे नाव ‘मगरमछ’ आणि दुसऱ्या तोफेचे नाव ‘हत्ती’ आहे. तिसऱ्या तोफेची जागा आहे.  पण तिसरी तोफ काही तिथे नाही. बुरुजा मध्ये जाण्या साठी पायऱ्या आहेत. मध्ये गेल्या नंतर कमान असून तेथून सर्व किल्ला दिसतो. बुरूज आणि किल्ल्याची स्थापत्यकला सुंदर आहे. नवबुरूज मी बघितला नाही पण माहिती मध्ये नाव येते. किल्ल्यात इतर इमारती सुद्धा आहेत. जसे की रंग महल, गणपती महल, अंबरखाना, जामा मशीद, लक्ष्मी महल, कोर्ट, इतर वास्तु. पण वेळे अभावी त्या बघू शकलो नाही. सगळ्या वास्तु बघण्यासाठी पूर्ण एक दिवशीय ट्रीप होऊ शकते. तर अशा पद्धतीने मी किल्ल्यावरील मुख्य आकर्षणे बघून तेथून निघालो.

मादी धबधबा
उपली बुरूज
रस्ता शोभीकरण
नर धबधबा
जलमहल परिसर
आतील तटबंदी
ई-रिक्षा
रस्ता
बुरूज

आतील रस्ता
हत्ती तोफ
परिसर
परिसर

Visits: 362

2 thoughts on “ब्लॉग : प्रवासवर्णन – अक्कलकोट आणि नळदुर्ग किल्ला – एक दिवसीय ट्रीप”

Leave a Reply