कविता : संयम
क्षण-क्षण जुळवून मनावर जडतो संयम
क्षणभंगुर सुख उपभोगता नाव होते दुय्यम
संयम बिघडता वाजतील तीन तेरा
संयम धरून होतील सातचे अकरा
रागावर नियंत्रण घटता उडतो संयम
रागाचे दुसरे नाव नुकसान हाच नियम
संयम राखता सहज मिळतो विजय
संयम दुरावताच फक्त मिळतो पराजय
संयमाने वाढवायचा असतो मनाचा तोल
नाही तर भावनांच्या वावटळीत घाव होतो खोल