गझल: काळजाला ठेच
वृत : देवप्रिया
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा
2122 2122 2122 212 = एकूण मात्रा: 26
*काळजाला ठेच*
काळजाला ठेच ही, आता भरावी वाटते
मी पणाला विश्रांती, कीर्ती उरावी वाटते
दुसर्याचा आदर्श डोळ्या समोरी का ठेवू
स्व विचारांची वाट आता धरावी वाटते
आसक्त दीर्घ सुखाची वाट कुठे संपली
मानवाला दु:खाची रात्र सरावी वाटते