निवडक चित्र चारोळी
Views: 139
निवडक चित्र चारोळी Read More »
विनाकारण उगाच झुंजतात माणसं
इतरांवर विश्वास ठेवून गंजतात माणसं
नात्यातला गुंता वाढवतात माणसं
वेड पांघरूण व्यर्थजगतात माणसं
सरड्या प्रमाणे रंग बदलतात इथे
पश्चातापा मुळे आत जळतात इथे
समई प्रमाणे सतत तेवत राहतात इथे
जीवाला-जीव लावणारे असतात इथे
कविता : कुटुंब आणि वाद Read More »
जगण्याच्या फाफटपसाऱ्यात विसरू नको मला
लहानपणीच्या लुटू पुटु खेळाची शपथ तुला
आठवतो का बघ आपण बांधलेला किल्ला
संवाद अखंड राहावा हे सांग स्वत:ला
जीवनाचे रहाटगाणे प्रवाही
वेळेचा मोबदला मिळेल तुला…
चल सुख दुःखाच्या गोष्टी सांगू एकमेकाला
भेटेल का वेळ दादा तुला….
भेटला का वेळ दादा तुला Read More »
मेघांनी आक्रमिले नभांगण
विचाराने आक्रसले प्रांगण
कोंडी काही केल्या फुटेना
पाऊस काही केल्या पडेना
क्षितिजावर जमले काळे ढग
जीवनात प्रतिबिंब पडले मग
पाऊस आला खुप जोरात
प्रश्नाचा निचरा झाला क्षणात
संकटे येऊदे झुंडीने कितीही,
लढताना सत्व नाही मोडणार
संकटाचे अश्व कितीही उधळोत,
प्रयत्नाचे आसूड त्यावर ओढणार
वावटळीत घोघावूदे भाग्याची लक्तरे,
परिश्रमाचा झेंडा कष्टाने रोवणार
परिस्थिती पुढे हार नाही मानणार…. Read More »
आई कडून मायेची अपेक्षा
पत्नी कडून प्रेमाची अपेक्षा
बहिणी कडून मैत्रीची अपेक्षा
नात्यात खऱ्या प्रेमाची अपेक्षा
शिक्षेत सूट मिळण्याची अपेक्षा
दुःखात सुख असण्याची अपेक्षा
सुखात जास्त पैसाची अपेक्षा
जास्त पैशात मानाची अपेक्षा
अपेक्षा आणि फक्त अपेक्षा Read More »
येताच होते स्वप्नांची पूर्ती
जाताना फक्त उदास मूर्ती
सोबत आणते जीवनात स्फुर्ती
बरोबर वाढत जातेे कीर्ती
दुःखी असताना येते आठवण
सुख मिळताच होते विसरण
आनंद लुटायला येतात सर्वजण
संकटात भेटत नाही एकपण
आनंदा कुठे होतास तु Read More »
मध्यस्थीची स्थळ जमवण्यासाठी लगबग – लगबग
मुलींच्या वडीलांची मुलीसाठी तगमग – तगमग
पाहूण्याची स्थळ शोधण्यासाठी दगदग – दगदग
निमंत्रित करतात उदघाटनाने झगमग – झगमग
मुलांना परिचय देतांना वाटते धगधग – धगधग
मुलींची सुंदर दिसण्याचीे असते झटपट – झटपट
लहानाची स्नँकसाठीे आईकडे कटकट – कटकट
ऐका मागून एक स्थळ बघतात पटपट – पटपट
मुलींना प्रश्न विचारताच कापतात लटलट – लटलट
रिफ्रेश होण्यासाठी चहा पितात घटघट – घटघट
वधू – वर परिचय मेळावा Read More »