कविता: परत पुन्हा

उजळून अंध:काराला उजाडेल नवीन पहाट पुन्हा
मनाला सापडेल अंध:काराच्या गर्भातून मार्ग पुन्हा
 
घेऊन काळजाचा ठाव केला मित्रानेच तीव्र वार पुन्हा
फंदी फितुरीचे पसरलं जाळं त्यात अडकाल परत पुन्हा
 
नात्याचा गुंता सोडवण्यात आयुष्यात वेळ दिला पुन्हा
दुसर्‍याच्या वागण्याने आपल्या आयुष्यात होतो गुंता पुन्हा

जीवनाच्या निळ्याशार आकाशात विजा कडाडल्या पुन्हा
हे ही दिवस जातील चांगले दिवस येतील परत पुन्हा

परत पुन्हा

Views: 76

Leave a Reply