ब्लॉग : प्रवासवर्णन – तिरूपती बालाजी दर्शन ट्रीप – दीड दिवसीय ट्रीप

आपण छोटा का होईना प्रवास का करतो? तर प्रवास मध्ये गप्पा टप्पा, सुख दु:खाची चर्चा, विचारपूस, निसर्गाशी संवाद आणि मना वर आलेला मरगळ दूर करण्या साठी करतो. या वर्षी करोना लॉकडाऊन नंतर तिरूपती बालाजी दर्शन करण्याची कुटुंबाची बालाजी दर्शनाला जायची इच्छा होती. पण कोविड मुळे काही जाता येत नव्हते. त्यात मी महाराष्ट्रात, मंदिर आंध्रात आणि मध्ये कर्नाटक, तेलंगणा मधून रस्ता जास्त असल्याने शक्य नव्हते. कारण प्रत्येक राज्याचे वेगवेगळे नियम आणि कधी कोणता नियम अर्ध्या रात्रीत येईल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे कोविड मुळे दर्शन लांबत गेले. आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणल्या प्रमाणे जुलै महिन्यात दर्शन पास तर 5 मिनिटात संपले. इकडे आधार कार्डचा नंबर टाके पर्यंत तर तिकडे तिकिट सुद्धा संपले. हे तर गाजलेल्या मोबाइल फ्लॅश सेल सारखे तिकिटे 5 मिनिटात संपून जात होती. दुसर्‍या प्रकारची तिकिटे होती पण आपल्याला भेटतील याची काही खात्री नव्हती. त्यामुळे आम्ही तिकडे फिरकलोच नाही. २४ ऑगस्टला परत सप्टेंबर महिन्याचे तिकिटे ओपन झाली. आणि ६ जणांचे तिकिट काढे पर्यंत तर ५ मिनिटात संपले सुद्धा. पण बहुतेक कोणाचेही तिकिट न निघाल्या मुळे परत १० मिनिटात तिकिट ओपन झाली. त्यामुळे मी strategy बदलली. एकदाच सगळे तिकिटे काढण्या पेक्ष्या ३-३ लोकांचे तिकिट काढत गेलो आणि त्यातच पूर्ण दिवस गेला. त्यात यश (भाचा) आधार कार्ड नसल्याने त्याला एक ही दर्शन मिळाले नाही. त्या साठी परत पर्यायी दर्शन तिकिटाची व्यवस्था केली. मग त्यात आमचे दुसरे दर्शन, यशचे एक दर्शन यांचा ताळमेळ घालणे नाकी नऊ आले. पण त्याची सुद्धा तयारी झाली. आमचे दुसरे दर्शन तिकिटे सुद्धा लगेच मिळाली. पण यशचे आधार कार्ड काढून दर्शन तिकिट काढायला थोडा वेळ लागला. रेल्वे आणि राहायची सोय या नंतर तिकिट पुराण एकदाचे संपले. रेल्वे, दर्शन, निवास तिकिट काढणे वेळ खाऊ काम होते.

करोना लॉकडाऊन नंतर रेल्वे प्रवास करणे आव्हानात्मक होते. विकाराबाद रेल्वे स्टेशन बाजूलाच एक महादेवाचे छान छोटेखानी मंदिर आहे. तिरूपतीच्या गाडी साठी खूप वेळ असल्याने तिथे 4 तास आराम केला. तिथे एक खोली घेतली. बाहेर बेडशीट टाकून मस्त घरून आणलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला. ११ लोक असल्याने मस्त छोटीशी पंगत झाली. जेवण झाल्या नंतर खेळायला काही नसल्याने रामची (भाचा वय – ७) फोटोग्राफीची हौस पार पडली. पुढील पिढी खूपच हुशार आहे. त्यामुळे रामने मा‍झ्या कडून कॅमेरा शिकून घेतला आणि त्याने लगेच सराव चालू केला. त्याला काय-काय शिकू असे होत होते. काही अर्धवट, काही छान असे रामने फोटो काढले. थोडीशी वाम कुशी आणि नंतर ताजेतवाने होऊन विकाराबाद रेल्वे स्टेशन वर पोहोचलो. रात्र भर प्रवास करून आम्ही तिरूपतीला सकाळी पोहोचलो.

महादेव मंदिर विकाराबाद

महादेव मंदिर विकाराबाद
विकाराबाद रेल्वे जंक्शन
गोविंदराज मंदिर – तिरूपति
गोविंदराज मंदिर – तिरूपति

लगेच गेस्ट हाऊस मध्ये चेक-इन केले आणि खोलीची चावी घेतली. परत तयार होण्यासाठी थोडा वेळ लागलाच. आमची दर्शनाची वेळ दुपारी ४ वाजता होती. गेस्ट हाऊस मध्येच आम्हाला ५ वाजले. आम्ही गाडी केली पण चालकाला तिरूमला मध्ये Rs ३०० दर्शन रांग कुठे आहे माहिती नव्हते. मग त्या समोर आमची काय काय बिशाद. लोकांना विचारात शेवटी एकदाचे रांगेत पोहोचलो. थोडी दुगदुग होती प्रवेश देतील का नाही? पण एकदाचे आधार कार्ड तपासणी झाली. त्यात एका मोठ्या हॉल मध्ये बसवण्यात आले. तिथे नाष्टा, बाथरूम, टीव्ही अशी सगळी व्यवस्था होती. शेवटी अर्ध्या तास झाल्या नंतर परत दर्शन रांगेत सोडण्यात आले. तेथून आम्हाला ४५ मिनिटे वेळ लागला. आणि शेवटी व्यवस्थित बालाजीचे दर्शन झाले. अतिशय प्रसन्न चित्त, सुंदर रूप, धीर गंभीर मुर्ती, शांत वातावरण, येणारी सकारात्मक स्पंदने, त्यातून मिळणारी वेगळी अनुभूति. प्रत्येक वेळेस प्रमाणे यावेळेसचे दर्शन आत्मीक सुख देऊन गेले. 

तिरुपति – तिरुमला घाट रस्ता
तिरुपति – तिरुमला घाट रस्ता

 तिरुपति – तिरुमला घाट रस्ता[/caption]

 तिरुपति – तिरुमला घाट रस्ता
तिरूपति – तिरूमला घाट रस्ता
 

आत्ता दर्शन झाले म्हणल्या वर पोटोबात कावळ्यांची आरडा ओरड सुरू झाली. लगेच बाजूला असलेले टीटीडी अन्नप्रसादम ला जाऊन भोजन घेतले. पोटातील कावळ्यांना आधी शांत केले. जेवणात फक्त भात आणि भात, सोबत खोबर्‍याची चटणी, गव्हाची खीर. पहिल्या वेळेस  दाक्षिण्यात वरण, नंतर आमटी, तद नंतर दही ताक यांची तिसरी खेप असायची. मागच्या वेळेस मी यावर एक लेख लिहिला होता. मग थोड्या वेळे नंतर आमच्यातील ज्यांच्या कडे मतदार कार्ड असलेल्यांना दुसर्‍या दर्शनाची संधी होती. त्यासाठी आम्ही ६ जण पात्र होतो त्यामुळे आम्ही तेवढेच लोक दर्शना साठी गेलो. दुसरे दर्शन लगेच ४५ मिनिटात झाले. पहिल्या प्रमाणे दुसरे दर्शन सुद्धा सुंदर झाले तेही 1 तासात. पण त्या नंतर जो ढग फूटी प्रमाणे पाऊस सुरू झाला तो काही दीड तास थांबतच नव्हता. तिरूमला मध्ये  असा पाऊस मी कधीच बघितला नव्हता. पाऊस कमी होई पर्यंत देवाच्या सानिध्यात दीड तास आम्ही मंदिरातच बसून होतो. त्या नंतर थोडा कमी झाला मग आम्ही निघालो. जेवणाची वेळ निघून गेली होती आणि दर्शन लाडू पण घ्यायचे बाकी होते. मग लगेच बाजूच्या बिल्डींग मध्ये पावसात भिजत गेलो भाच्या करीबॅग घेऊन आला. आम्ही लाइन मध्ये थांबलो. पण लाडू घेतलेच. कारण बालाजीचे लाडू खासच असतात. लाडूचं वजन जवळपास 175 ग्राम, काजू, बदाम आणि बरेच काही त्यामुळे हा लाडू सगळ्यांचा आवडता आहे. शेवटी 14 किमी फिरून रात्री 12.00 ला सगळ्यात व्यस्त दिवस संपला.

टीटीडी अन्नप्रसादम
[/caption]

 

दुसर्‍या दिवशी पहिल्या दिवसाचा क्षीण आलाच होता. थोडी आळसावलेली सुरुवात झाली. नाष्टा करून थेट लेपाक्षी दुकान गाठले आणि थोडी खरेदी झाली. मग लगेच रूम सोडून तिरूपती गाठली. दुसर्‍या दिवशी पद्मावती दर्शन करायचे होते. गाडी करून परत “श्रीनिवासम” गेस्ट हाऊस इथे गेली आणि तेथून पद्मावती दर्शन घेतले. पण दुपारचे जेवण राहिले होते. या वेळेस “बुलढाणा अर्बन बँक यात्री निवास” इथले महाराष्ट्रीयन जेवण टेस्ट करायचे ठरले. मग त्यांना फोन करून सांगीतले आणि हॉटेल बंद होण्या अगोदर आम्ही तिथे पोहोचलो. आणि मस्त, रुचकर जेवणावर आडवा हात मारला. शेवटी 5.30 च्या आत रेल्वे स्टेशन ला हजर राहून परतीची गाडी पकडली. अश्या प्रकारे दीड दिवशीय बालाजी ट्रिप करून आम्ही चवथ्या दिवशी महत्त्वाचे दर्शन घेऊन घरी पोहोचलो. जरी ट्रिप लहान असली तरी आम्हाला भरपूर काही देऊन चेहर्‍यावर हास्य खुलवून गेली जसे की रामची फोटोग्राफी, दोन दर्शनासाठी झालेली धावपळ, वेगळे नियोजन आणि सुंदर असे बरेच काही.

Views: 253

Leave a Reply