कविता – मातृत्व आणि कारकीर्द

Top post on IndiBlogger, the biggest community of Indian Bloggers

सर्व महिलांना ज्या आपल्या अपत्याला कारकीर्द समजतात आणि ज्या महिला मातृत्व आणि कारकीर्द या दोन्ही आघाड्यावर लढतात त्यांना समर्पित. अपत्याला जन्म दिल्यानंतर तीन वर्षा नंतर व्यावसायिक कारकीर्द सुरु करणाऱ्या शुभेच्छा.

कविता – मातृत्व आणि कारकीर्द

नवा सूर्य अन नवी आशा

नवीन पर्व अन नवीन दिशा

अपत्यासाठी तीन वर्ष कार्य विराम
मुल अन कारकीर्द यांना नाही विश्राम

पेललेले आव्हान पुन्हा जगणार
जिंकलेले क्षितिज पुन्हा गाठणार

मातृत्वात दिली संयमाची परीक्षा
कर्तव्यदक्ष होईन हीच खरी अपेक्षा

कार्यक्षमता अन संयम माझा बाणा
कुटुंब हाच मा‍झ्या जगण्याचा कणा

वाट बघताय माझ एकटे पिलू घरट्यात
मन ओथंबले करियरच्या आखाड्यात

घररुपी बंधाने पतंग इंद्रधनुवर स्वार
परिस्थितीत कधीही मानणार नाही हार

कविता - मातृत्व आणि कारकीर्द
मातृत्व आणि कारकीर्द

Photo Courtesy – Google

Views: 49

Leave a Reply