या कवितेची “९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ – कविकट्टा” या काव्यमंचा साठी निवड होऊन कविता वाचन झालेले आहे.
आठवते का मित्रा सुंदर संध्याकाळ
तिथेच उघडली होती मैत्रीची टाकसाळ
तुला लक्षात आहे का आपला कट्टा
भांडलो तरी मैत्रीला लागला नाही बट्टा
का जातोस मित्रा नोकरीसाठी शहरात
मैत्रीचे छान मंदिर उभारू याच नगरात
आयुष्यात मैत्रीचा नवीन सूर्य उजळू दे
रखरखीत उन्हात जुने सवंगडी आठवू दे
ऑफिस मधील असंख्य विषयावर गप्पा
ओलांडला नाही कधी मैत्रीचा अबोल टप्पा
गप्पिष्ट मित्र अन् विविध भावनांचा खेळ
भेटेल का पुन्हा मौज मस्तीला खास वेळ
उडला असेल कधी विचारांचा खटका
मैत्रीला लागला नाही कधीच ठसका
मित्राला निरोप देताना का होते तळमळ
मागच्या आठवणी का करतात हळहळ
Views: 97