फोटोग्राफी : सिंहगड परिसर – बटरफ्लाय
फोटोग्राफी : सिंहगड परिसर – बटरफ्लाय
फोटोग्राफी : सिंहगड परिसर – बटरफ्लाय Read More »
फोटोग्राफी : सिंहगड परिसर – बटरफ्लाय
फोटोग्राफी : सिंहगड परिसर – बटरफ्लाय Read More »
फोटोग्राफी – गणेशोत्सव २०२४ – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
फोटोग्राफी – गणेशोत्सव २०२४ – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती Read More »
ब्लॉग – व्यक्तिविशेष – रियर ॲडमिरल – #FOSM – चेतन चं. चंडेगावे
आपल्या आजूबाजूलाच प्रेरणादाई गोष्टी सतत घडत असतात. आणि व्यक्तिमत्व व्यक्ती सुद्धा आपल्याच जवळपास असतात. एक प्रभावशाली आणि यशस्वी माणसाचे व्यक्तिमत्व कसे असावे तर ते आमच्या राजू दादा कडे पाहून समजते. चेतन चं. चंडेगावे यांना आम्ही सगळे प्रेमाने राजू दादा म्हणतो. माणसाचा मोठेपण कधी सिद्ध होते तर तो आपल्या नातेवाईकांना, सहकार्यांना, लहान मोठ्यांना कसे वागवतो. बोलण्यात तर राजू दादाचे विशेष प्राविण्य आहे. प्रत्येकाला भेटताना दादाच्या चेहर्यावर स्मित हास्य, स्मरणशक्ती उत्तम असल्याने संभाषणात मागच्या आठवणी काढून हसवतो. भारतीय नौदलात मोठ्या पदावर असून सुद्धा संभाषण करताना पुढील व्यक्तीला सहज मन मोकळे बोलून आपलेसे करतो. दादा 2-3 वर्षा नंतर सुद्धा भेटला असेल तरी काल परवाच भेटला होता असे वाटते. कोणताही विषय घेतला तर त्याच्याकडे काही ना काही जास्तीची माहिती असतेच. मग ते राजकारण असो समाजकारण असो शिक्षण असो संगीत असो किंवा कोणताही जागतिक विषय असेल. प्रत्येक बाबतीत त्याच्याकडे काहीतरी महत्त्वपूर्ण माहिती असते. कदाचित सतत वाचनामुळे आणि चांगल्या आकलन शक्तीमुळे त्यालाही क्षमता प्राप्त झाली असेल.
ग्रामीण भागातून येऊन खडतर संघर्ष करत, नव-नवीन आव्हानांना सामोरे जात, जिद्द, अविरत परिश्रमांना नवीन उंचीवर नेत भारतीय नौदलात दादाने आपले स्थान निर्माण केले आहे. राजू दादाचे मूळगांव ‘उदगीर’ आहे. प्राथमिक शिक्षण ‘व्यंकटेश विद्यालय’ लातूर इथे झाले आहे. सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण सैनिक स्कूल सातारा इथे पार पडले. त्यानंतर एनडीए ची (National Defense Academy) परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय नौदल अकॅडमी (Indian Naval Academy – Goa) इथे खडतर प्रशिक्षण झाले आहे. दादा १९९२ ला नौदल अकॅडमीचे प्रशिक्षण पूर्ण करून नौदलात अधिकारी म्हणून कार्यरत झाला. भारतीय नौदलात विविध जबाबदारी पार पडत त्याच्या प्रवास ‘रियर ॲडमिरल(Rear Admiral)’ या पदा पर्यंत पोहोचला आहे. आयएनएस रणवीर या अत्यंत महत्त्वाच्या भारतीय युद्धनौकेचे नेतृत्व सुद्धा केले आहे. दादा कोणालाही भेटला तर त्याची चुणूक सर्वांनाच जाणवते. तशीच ती त्याच्या वरिष्ठांना आणि सहकाऱ्यांना नक्कीच जाणवली असणार. त्यामुळे एका मागे एक नौदलातील महत्त्वाची शिखरे त्याने पादाक्रांत केली.
नौदलात गेल्यानंतर त्याची पाणबुडी विभागात निवड झाली. पाणबुडी मध्ये काम करत असताना अत्यंत खडतर आणि कठीण परिस्थितीमध्ये काम करावे लागते. अतिशय छोट्या जागेमध्ये राहत मोठी-मोठी आव्हाने पार पाडावी लागतात. समुद्रात पाणबुडी जेव्हा एखादे टारगेट दिल्यानंतर नौकानयनासाठी जाते तेव्हा काही वेळेस कित्येक दिवस, आठवडे कुटुंबाशी सुद्धा संपर्क करता येत नाही. पाणबुडीचा प्रवास हा समुद्राच्या खालूनच चालू असतो. त्यामुळे तेथील आव्हाने खूपच जगा वेगळी असतात. परंतु त्याची कार्य कुशलता, समर्पण, तात्काळ निर्णय घेण्याची पात्रता, हजरजबाबीपणा, सतत नाविन्यपूर्ण गोष्टी अमलात आणण्याची क्षमता यामुळे तो नेहमीच नौदलाच्या वेगवेगळ्या मिशन मध्ये पात्र होत गेला. अगदी सुरुवातीलाच तो सोमालिया आणि केनिया च्या नेमून दिलेल्या नौदल कामगिरी वरती गेला. त्यानंतर काही दिवसातच आयएनएस सिंधूराज या पाणबुडीला पाण्याच्या खालून ३ महिन्याचा प्रवास करून रशियावरून भारतात आणण्याचा मोहिमेत महत्त्वाचा वाटा होता. नंतर नौदलामध्ये त्याची थायलंड येथील प्रशिक्षणासाठी निवड झाली. दादा १९९२ च्या बॅचचा अधिकारी असून ऑस्ट्रेलिया येथील दुतावासात संरक्षण सल्लागार म्हणून सुद्धा आपली सेवा दिली आहे. तिथे असताना दादाने संरक्षण सल्लागार म्हणून फिजी, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी आणि टोंगा या देशाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळलेला आहे. विविध देशाच्या मान्यवर मंडळी आणि संस्थेला भेट दिली आहे. त्या सोबत केनिया, सोमालिया, रशिया या देशात कर्तव्य बजावले आहे. “पोलादी माणसे – लातूर जिल्हा” या पुस्तकात दादावर विस्तृत लेख प्रकाशित झाला आहे.
सध्या चेतन चं. चंडेगावे याला भारतीय नौदलात ‘रियर ॲडमिरल(Rear Admiral)’ या पदावर बढती मिळाली आहे. रियर ॲडमिरल हे पद अत्यंत आदर्श आणि प्रतिष्ठित मानले जाते. सध्या या पदावरती काम करत असताना त्याच्याकडे भारतातील सगळ्या पाणबुडीच्या सेफ्टी आणि प्रशिक्षण विषयी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. भारतीय नौदलात रियर ॲडमिरल हे एक फ्लैग ऑफिसर किंवा फ्लैग रॅंक असून कोमोडोर रॅंक आणि वाइस ॲडमिरल मधील पद आहे. भारतीय नौदलात या पदाला ‘दोन स्टार’ फ्लैग ऑफिसर रॅंक सुद्धा म्हणतात. जसे की वाइस ॲडमिरल ‘तीन स्टार’ आणि ॲडमिरल हे ‘चार स्टार’ फ्लैग ऑफिसर रॅंक पद आहे. भारतीय नौदलात रियर ॲडमिरल पद 32-35 वर्षाच्या खडतर सेवेनंतर मिळते. रियर ॲडमिरल हे पद भारतीय सेनेतील मेजर जनरल आणि वायुसेनेतील एयर व्हाइस मार्शल पदाशी समकक्ष आहे. रियर ॲडमिरल कडे रणनीती आणि धोरणात्मक नियोजन, प्रशिक्षण, नौदल तुकडीचे(तळ किंवा आस्थापना) नेतृत्व आणि मुत्सद्दीपणा आणि आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय आणि बहुपक्षीय परस्पर संवाद अश्या जबाबदार्या असतात. रियर ॲडमिरल च्या खांदेपट्टी मानचिन्ह वर दोन स्टार असतात. बाहीपट्टी वर एक लहान आणि एक मोठी पट्टी आहे. लहान पट्टी वर वर्तुळ आहे. भारतीय अग्रक्रमाचा क्रम (Order of precedence in India) यामध्ये रियर ॲडमिरल यांचा २६वा अग्रक्रम येतो.
‘रियर ॲडमिरल’ चेतन चं. चंडेगावे यांनी 18वे Flag Officer Submarines (FOSM – Seat – विशाखापट्टणम) म्हणून पदभार ‘रियर ॲडमिरल’ के. वेंकटरामन यांच्या कडून 1 सप्टेंबर 2024 रोजी पदभार स्वीकारला आहे. या पदावर असलेली व्यक्ती नौदलाच्या पाणबुडी ताफ्याचे धोरणात्मक, आधुनिकिकरण, देखभाल, सुरक्षा आणि बचाव, आणि प्रशासनिक नियंत्रण ठेवते, ज्यामुळे भारताच्या सागरी संरक्षण आणि सामरिक बळकटतेसाठी हे पद अत्यंत आवश्यक ठरते. FOSM पदावर असणारी व्यक्ति अत्यंत अनुभवी असते. त्यांनी अनेक वर्ष वेगवेगळ्या पाणबुड्या वर सेवा बजावलेली असते. यांच्याकडे भारतीय नौदलातील सर्व प्रकारच्या पाणबुडींची देखरेख असते, ज्यात विविध पाणबुड्या यांचा समावेश आहे. या सोबत ‘पाणबुडी विरोधी युद्ध’, गुप्तचर माहिती संकलन, सागरी प्रतिबंध, सागरी नियंत्रण आणि विशेष ऑपरेशन्स यात निपुण असतात. FOSM पद या FOC-in-C ENC (Flag Officer Commanding-in-Chief Eastern Naval Command) पदावरील वरिष्ठांना रीपोर्ट करतो.
भारत हा ‘आण्विक त्रिकट (Nuclear Triad)’ संपन्न देश आहे. थोडक्यात अणुबॉम्ब जमीन वरून मिसाईल द्वारे, हवेतून विमाना द्वारे, आणि पाण्यातून पाणबुडी द्वारे प्रक्षेपित करण्याची क्षमता असणे. जगात ‘आण्विक ट्रायड देश’ फक्त 5 देश आहेत. भारतीय नौदलात सशस्त्र आण्विक पाणबुडीतून अणुबॉम्ब प्रक्षेपित करण्याची अचूक क्षमता आहे. यात अणू-चालित आक्रमक पाणबुड्या (SSNs) आणि सामरिक बॅलिस्टिक मिसाईल पाणबुड्या (SSBNs) पाणबुड्या आहेत. भारताचा “प्रथम वापर नाही” हा आण्विक सिद्धांत आहे. आणखी एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी असते ती म्हणजे अणू-चालित आक्रमक पाणबुड्या (SSNs) आणि सामरिक बॅलिस्टिक मिसाईल पाणबुड्या (SSBNs) यांचे प्राथमिक दायित्व FOSM कडे असते.
याच महिन्यात आयएनएस अरिघात ही अरिहंत-श्रेणीच्या (Arihant-class) अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. आयएनएस अरिघात (INS Arighat) ही पूर्णपणे स्वदेशी विकसित तंत्रज्ञानावर आधारित पाणबुडी आहे. आयएनएस अरिघात ही भारतीय नौदलातील दुसरी अणुऊर्जेवर चालणारी बॅलिस्टिक मिसाईल पाणबुडी (SSBN) आहे, जी भारताच्या आण्विक त्रिकटाचा (Nuclear Triad) महत्त्वाचा भाग आहे. आयएनएस अरिघात चे अंदाजे 6,000 टन विस्थापन वजन आहे आणि अणु ऊर्जेवर चालणारी असल्याने दीर्घकाळ पाण्याखाली राहू शकते. K-4 मिसाइल्सची रेंज मारक क्षमता 3,500 किमी पर्यंत आहे. पाणबुडीला अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे तिला शत्रूच्या सोनार (SONAR) वर शोधणे अत्यंत अवघड होते. आयएनएस अरिघात चे आण्विक प्रतिबंध हे प्रमुख कार्य आहे आणि “प्रथम वापर नाही” धोरण असल्याने गरज पडल्यास दूसरा प्रहार करण्यास अतिशय सक्षम आहे. तज्ञांच्या मते भारताला कमीत कमी ३-४ SSN किंवा SSBN पाणबुडीची गरज आहे. तज्ञांच्या मते बहुतेक तिसरी SSBN आयएनएस अरिधमन पाणबुडी लवकरच भारतीय नौदलात सामील होईल.
दादाच्या प्रगतीला त्याच्या कुटुंबाची सर्वोत्तम साथ आहे. आई, वडील, पत्नी, मुलगी, बहीण, भाऊ, आणि बच्चे कंपनी असा मोठा परिवार आहे. देश सेवा डोळ्यासमोर ठेवून संघर्ष करत, आव्हानांना सामोरे जात, अविरत परिश्रम करत प्रगती करणे बहुतेक हाच त्याचा गुरूमंत्र आहे. राजू दादाला पुढील वाटचाली साठी लक्ष-लक्ष शुभेच्छा. दादाच्या हातातून महान देश सेवा घडावी हीच सदिच्छा.
शब्द/Long Form
FOSM – Flag Officer Submarines
SSBNs – Ship Submersible Ballistic Nuclear Submarine
SSNs – Ship Submersible Nuclear Submarine
SONAR – Sound Navigation and Ranging
आयएनएस – INS – Indian Naval Ship
एनडीए – National Defense Academy
भारतीय अग्रक्रमाचा क्रम (Order of precedence in India)
FOC-in-C ENC – Flag Officer Commanding-in-Chief Eastern Naval Command
आण्विक त्रिकट – Nuclear Triad
ब्लॉग – व्यक्तिविशेष – रियर ॲडमिरल – #FOSM – चेतन चं. चंडेगावे Read More »
“युद्धस्य कथा रम्य:” अशी म्हण आहे. युद्धाच्या गोष्टी ऐकावयास फार गोड वाटतात. आणि त्या सोबत एक प्रेम कथा दाखवलेली असेल तर या दोन्हीच्या खास संयोगातून एक प्रकारचे उत्तम समीकरण तयार होते. ऐतिहासिक प्रेम कथा या प्रकारातील चित्रपट आहे. पत्र पाठवणे सुद्धा एक कला आहे. जुन्या काळी पत्र पाठवणे विचारपूस करण्याचे साधन होते. त्यात भावनेने ओथंबलेले, परिस्थितीची जाणीव करून देणारे, मनस्थितीचे सुरेख वर्णन असल्यास काय बघायचे. आपल्या प्रिय आणि आप्त जणांना विचारपूस करता येत होती आणि ती पत्र जतन करून ठेवल्यास त्याच्या सुरेख आणि सुंदर आठवणी आयुष्य भरा साठी पुरतात. याच पत्राचा सुरेख वापर या चित्रपटात केला आहे.
फोटोग्राफी : पक्षी आणि प्राणी
फोटोग्राफी : पक्षी आणि प्राणी Read More »
झालेला पराभव लागला तुला जिव्हारी
आता केव्हा घेणार तु परत भरारी?
कसे कळणे नाही तुला छुपे संगनमत
ना कळले तुला नात्यातील मिलीभगत
तुझ्या पराभवास फक्त तूच कारणीभूत
घनिष्ठ लोकांनीच केले तुला परत पराभूत
अपमान गिळून टाक घे पुन्हा नवा संकल्प
पुन्हा यशस्वी होऊन कर सगळ्यांना गप्प
उपहास, अवमान, कुचेष्टा सहन करून घे
बुद्धीने, सहनशक्तीने संकटांना घालवून ये
पराभव अन् कुचेष्टा ही पहिली पायरी
शून्यातून भरारी घेण्यास परत कर तयारी