कथा : मैत्रा – भाग १
मैत्रा ऑफिसच्या मैत्रिणी सोबत पार्टीचा आनंद लुटत होती. शहरातील ते एक नामांकित हॉटेल होते. हॉटेल इमारतीच्या छताच्या खुल्या जागेवर होते. संध्याकाळची वेळ… छान आल्हाददायक वातावरण… मंद सुटलेली हवा… यामुळे पार्टीचा माहोल बनला होता. मैत्राच्या मैत्रिणी सोबत मस्त गप्पा टप्पा चालल्या होत्या. पार्टी आता रंगात आली होती. मैत्राच्या मैत्रिणी बोलण्यात इतरत विखुरल्या होत्या. मैत्रा तिच्या जिवलग मैत्रिण किर्ती सोबत जेवणाचा पुरेपूर आस्वाद लुटत होती.
कथा : मैत्रा – भाग १ Read More »