लघुकथा – आनंद आणि दु:ख
जवळपास ९.३० च्या दरम्यान गजानन धावत पळत हॉस्पिटल कडे निघाला. चौथ्या मजल्यावर पोहोचल्यावर त्याला थोडे हायसे वाटले. पण तिथे आयसीयू समोर थोड्याश्या जागेत लोकांनी आप आपली आंथरूण टाकून आरामात बोलत बसलेली होती. तो हताशपणे सगळी कडे झोपण्यासाठी जागा पाहत होता. पण त्याला काहीच यश आले नाही. तिथे एक जागा रिकामी होती तिथे तो आंथरूण टाकणार तेवढ्यात त्याला कोणी तरी सांगितले की ही तर लक्ष्मणची ठरलेली जागा आहे. गजाननने आंथरूण टाकणार तेवढ्यात तिथे किडकिडीत मनुष्य आला. गजानन बाजूला झाला. त्याला समोर असलेल्या मेडिकलच्या अतिशय कडेला झोपायला जागा भेटली. तिथे रात्री सारखी गर्दी व्हायची त्यामुळे झोप पूर्ण व्हायची नाही. त्यामुळे गजाननची चिडचिड झाली.
रोज झोपण्याच्या जागेसाठी ओढाताण व्हायला लागली. जेवण संपवून गजानन लगेच हॉस्पिटल कडे निघाला. तिथे लक्ष्मणची एकच जागा रिकामी होती. तिथे गजाननने आंथरूण टाकले. जागेवरून दोघांचे थोडे भांडण झाले. गजानन मागे हटला नाही. शेवटी लक्ष्मणला मेडिकलच्या कडेला झोपायला जागा भेटली.
दुसर्या दिवशी त्यांना आजूबाजूला जागा मिळाली. पण दोघं काहीच बोलले नाहीत. लक्ष्मणच्या बाजूला आणखी व्यक्ति दिसत होतो. गजानन त्यांचे बोलणे ऐकत होता.
राम – “लक्ष्मण आज आयसीयू मध्ये लक्ष्मीला भेटला का रे”
लक्ष्मण – नाही अण्णा. मी इथेच राहतो पण लक्ष्मीला काही भेटू वाटत नाही.
राम – का?
लक्ष्मण काहीही न बोलता थोड्या वेळा साठी निघून गेला. काही दिवसा खाली त्याच्या वडीलांना आजारपणा मुळे इथे हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते.
आठवड्या नंतर सुद्धा दोघात बोलणे नव्हते. 9 वाजता अचानक एक बेड आयसीयूच्या बाहेर येत होता. त्या महिला पेशंट सोबत लक्ष्मण होता. बाजूचे लोक सांगत होते की, एक धर्मादाय संस्थेने लक्ष्मणच्या बायकोला इथे अॅडमिट केले होते. लक्ष्मण त्याच्या बायकोला घाटी रुग्णालयात घेऊन जात आहे. बिल खूप झाल्यामुळे लक्ष्मणला बायकोला तिकडे घेऊन जात होता. ही दृश्य बघून गजाननला अतिशय वाईट वाटले. दोघांचे जागेवरून भांडण झाले होते. गजाननला झोपण्याची जागा मिळाली होती. पण त्याला आज झोपण्याचे सुख मिळणार होते. पण छोट्या गोष्टीवरून लक्ष्मणशी भांडण झाले यांचे दु:ख सुद्धा होते.
लघुकथा – आनंद आणि दु:ख Read More »