Skip to content
Bhagwat Balshetwar
अद्वितीय अनुभव...

मराठी कथा, कविता, लेख, चित्रपट परीक्षण, प्रवासवर्णन, फोटोग्राफी, पुस्तक, कोट्स, आणि इतर साहित्य

  • कथा
    • लघु कथा
    • शत शब्द कथा
  • कविता
    • चित्र चारोळी
    • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – कविकट्टा
  • लेख
    • व्यक्ती विशेष
  • प्रवासवर्णन
  • चित्रपट परीक्षण
  • फोटोग्राफी
    • पक्षी फोटोग्राफी
    • फोटोग्राफी – गणेशोत्सव
  • कोट्स
  • पुस्तक
    • वडिलांची प्रकाशित साहित्य संपदा
  • इतर साहित्य
  • About
    • क्षणचित्रे आणि समारंभ
    • फोटोग्राफी अवॉर्ड
    • Privacy Policy
Bhagwat Balshetwar
अद्वितीय अनुभव...

मराठी कथा, कविता, लेख, चित्रपट परीक्षण, प्रवासवर्णन, फोटोग्राफी, पुस्तक, कोट्स, आणि इतर साहित्य

  • कथा
    • लघु कथा
    • शत शब्द कथा
  • कविता
    • चित्र चारोळी
    • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – कविकट्टा
  • लेख
    • व्यक्ती विशेष
  • प्रवासवर्णन
  • चित्रपट परीक्षण
  • फोटोग्राफी
    • पक्षी फोटोग्राफी
    • फोटोग्राफी – गणेशोत्सव
  • कोट्स
  • पुस्तक
    • वडिलांची प्रकाशित साहित्य संपदा
  • इतर साहित्य
  • About
    • क्षणचित्रे आणि समारंभ
    • फोटोग्राफी अवॉर्ड
    • Privacy Policy

ब्लॉग – पत्र लेखन – अभिजीत – नवीन व्यवसाय

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / November 21, 2021
लेख#Bhagwatलिखाण पत्र लेखन लेख व्यक्तीविशेष

माणसाने स्वप्न आणि प्रगती करण्याची इच्छा दर्शवणे आणि त्यासाठी संकल्प करणे आणि विशेष प्रयत्न करून तडीस नेणे ही उद्योजक बनण्याची पहिली पायरी आहे. मला आठवते तू प्रसिद्ध “येवले” चहा franchise साठी प्रयत्न केला होता. “The secret of getting ahead is getting started.” – Sally Berger सॅली यांनी म्हंटल्या प्रमाणे तू आता मित्रा सोबत उद्योजक होण्याचे पहिले पाऊल “मैत्री कट्टा हॉटेल” च्या उद्घाटनाने टाकत आहेस. तू जेव्हा “मैत्री कट्टा”ची माहिती देत होतास त्यावेळेस मला काहीही विशेष वाटले नाही. कारण मला माहिती होते, तुला उद्योग जगतात येण्याची तीव्र इच्छा काही स्वस्थ बसू देणार नाही. “येवले” नंतर तू या गोष्टी या पाठपुरावा करतच असशील आणि योग्य वेळ येता त्यातून सुसंधी निर्माण करत उद्योग जगताला जवळ करशील. आणि झालेही तसेच. आज ही त्यांना व्यवसाय करण्याची अनावर इच्छा आहे. यशस्वी होण्यासाठी लागणारे गुण जसे की गुणवत्ता, नियोजन, चिकाटी, जोखीम व्यवस्थापन, सुसंघटित पणा या तुझ्या मध्ये आधीच आहेत. फक्त त्याचा योग्य वेळी योग्य वापर झाला की अर्धी लढाई तू जिंकशील.

ब्लॉग – पत्र लेखन – अभिजीत – नवीन व्यवसाय Read More »

ब्लॉग : लेख : चित्रपट पार्श्वसंगीत (Back Ground Music)

Bhagwat Balshetwar / 2 Comments / April 13, 2021
लेखचित्रपट लेख
music sheet showing musical notes

समजा तुम्ही चित्रपट बघत आहात आणि एक सस्पेन्स युक्त धीरगंभीर असा संवाद चालू आहे. पण संवाद चालू असताना पार्श्वसंगीतच नसेल तर तुम्हाला जेवणात मीठच नाही असा अनुभव येईल. ते संवाद तुम्हाला कदाचित भारदस्त वाटणार नाहीत किंवा त्यातील पूर्ण मज्जाच जाईल. जर चित्रपट भोजनाची परिपूर्ण थाली असेल तर मुख्य पदार्थ कथा, भात संगीत आणि पार्श्वसंगीत मिठाचे काम करेल. त्यामुळे पार्श्वसंगीता शिवाय चित्रपटाला गोडीच नाही.
पार्श्वसंगीत मानवीय भाव भावनांचा अचूक वेध घेते. समजा बाहुबलीची लढाई चालू आहे आणि त्यात पार्श्वसंगीत नसेल तर विचार करा बाहुबली चित्रपटाला एवढी प्रसिद्धी भेटली असती का? नक्कीच तुमचे उत्तर नाही असेच येईल. कारण या चित्रपटातील प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगात अगदी योग्य आणि प्रभावी पार्श्वसंगीताचा वापर केला आहे. बाहुबलीचा विषय असेल तर मी या चित्रपटाचे पार्श्वसंगीत आज ही ऐकतो. “WKKB” हे बॅकग्राऊंड स्कोर तर मा‍झ्या अतिशय आवडीचे आहे. बाहुबली दोन्ही चित्रपट सर्व अर्थाने परिपूर्ण आणि भारतीय चित्रपट सृष्टि साठी मैलाचा दगड आहेत. “म. म. कीरवाणी” यांनी दोन्ही चित्रपटाचे मिळून पार्श्वसंगीताचे 10 OST Volume काढले आहेत. आणि चित्रपटात अतिशय चोख वापरले आहेत.

ब्लॉग : लेख : चित्रपट पार्श्वसंगीत (Back Ground Music) Read More »

ब्लॉग – व्यक्तीविशेष – डॉ श्रीनिवास मधुकरराव बलशेटवार – भाग १

Bhagwat Balshetwar / 2 Comments / August 31, 2020
लेख#Bhagwatलिखाण कुटुंब लेख व्यक्तीविशेष

ब्लॉग – व्यक्तिविशेष – डॉ श्रीनिवास मधुकरराव बलशेटवार – भाग १ मी १९९८ साली दहावी पास झालो. एखाद्या ठिकाणचे, स्थळाचे आणि तुमचे ऋणानुबंध वेळे सोबत अतिशय घट्ट होत जातात. मी अकरावीला शिवाजी महाविद्यालय उदगीर इथे प्रवेश घेण्यासाठी गेलो. मा‍झ्या सोबत भैय्या (श्रीनिवास मधुकरराव बलशेटवार) आला होता. वडील मंडळी त्याला प्रेमाने शिवा, त्याच्या पेक्षा लहान त्याला

ब्लॉग – व्यक्तीविशेष – डॉ श्रीनिवास मधुकरराव बलशेटवार – भाग १ Read More »

लॉकडाउन – सोशल मिडिया वर प्रभावशाली व्यक्ती

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / June 11, 2020
लेख#Bhagwatलिखाण लेख लॉकडाऊन

लॉकडाउन – सोशल मिडिया वर प्रभावशाली व्यक्ती  लॉकडाउनचा आत्ता ५.० टप्पा चालू आहे. या टप्यात भरपूर मोकळीक मिळाली आहे. पण या अगोदरच्या टप्प्यात पुष्कळ प्रमाणात निर्बंध होते. टीव्हीवर सगळी कडे करोना बाबत नकारात्मक वातावरण होते. त्याच-त्याच बातम्या बघून कंटाळा यायचा. मी टीव्ही वर त्याच-त्याच ब्रेकिंग न्यूज बघणंच सोडून दिले. कोणाला बाहेर जाऊन बोलता येत नव्हते.

लॉकडाउन – सोशल मिडिया वर प्रभावशाली व्यक्ती Read More »

ब्लॉग – व्यक्तीविशेष – माझी आई

Bhagwat Balshetwar / 4 Comments / May 1, 2020
लेखआई कुटुंब लेख व्यक्तीविशेष

देव, निसर्ग तुम्ही जन्मल्यानंतर पालन पोषणासाठी सोय करत असतो. देवाने तुम्हाला पाठवण्या अगोदर एक विशेष देवदूताची नेमणूक केलेली असते. तुम्ही जन्माला आल्यापासून तो देवदूत तुमचे पालन पोषण करत असतो. देवाने खास नेमणूक केलेल्या देवदूताचे नाव आहे “आई”. माणसाचा जीवनपट खुप मोठा असतो. माणसाच्या भावभावना, आचार, विचार, अनुभव, आनंद, दु:ख तुम्ही शब्दबद्ध करू शकता पण त्या हुबेहूब कागदावर उमटतील याची काही शाश्वती नाही. तरी मी मा‍झ्या आईच्या जीवनातील काही क्षणांचे प्रगटीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे.

ब्लॉग – व्यक्तीविशेष – माझी आई Read More »

लेख – “देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी।तेणें मुक्ति चारी साधियेल्या॥”

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / April 11, 2020
लेखअभंग लेख हरिपाठ

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतवाणी ने पावन झालेल्या हरिपाठा मधील हा पहिलाच अभंग आहे. माऊलीचे गुणगान करताना शब्द आणि भावना कमी पडतील. माऊली म्हटले की अंत:करणातील उत्तुंग चांगले भाव उचंबळून येतात. माऊली आपले अंत:करण व्यापून टाकतात. हरिपाठाचा हा अभंग मला अतिशय आवडतो पण पहिल्यांदा मला कोडे पडले होते की मंदिराच्या फक्त दारात उभे राहिले तरी तुम्हाला मुक्ती भेटते. आपण मंदिरात दर्शन करून आल्यावर मंदिरात बसतो. पण त्यामुळे प्रत्येकाचे कल्याण होईलच असे नाही. पण आपण मंदिरात इतक्यांदा जाऊन आपल्या किंवा कोणालाही मुक्ती मिळत नाही हा प्रश्न मला कित्येकदा पडला होता. कारण आपण वरवर विचार करतो. या अभंगाचा काय किंवा कोणत्याही अभंगाचा ऊहापोह करण्याचा आपल्याला अधिकार आणि प्रयोजन नाही. पण आपल्या परीने अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करू शकतो.

लेख – “देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी।तेणें मुक्ति चारी साधियेल्या॥” Read More »

ब्लॉग : लेख : Indian Navy Ship रणवीर

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / December 8, 2019
लेखनेव्ही लेख

लहानपणा पासून मला भारतीय सैन्य आणि नौदल बद्दल प्रचंड आकर्षण होत. मी लहानपणी सातारा सैनिक स्कुल साठी परीक्षा सुद्धा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी मी विशेष क्लासेस सुद्धा लावले होते. परंतु मी सातारा सैनिक स्कुल प्रवेश परीक्षा काही चांगल्या मार्काने पारित होऊ शकलो नाही. पण एखादा आर्मी/नौदल ऑफिसर भेटल्या नंतर त्यांचा पोशाख, चालण्यात एक प्रकारचा रूबाब, आणि बोलण्यात आत्मविश्वास बघून भारतीय नौदला बद्दल प्रचंड आदर आणि आकर्षण वाटते. मला भारतीय नौदला विषयी जाणून घ्यायला खूप आवडते. भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. भारतीय नौदला कडे अत्याधुनिक युद्धनौका, विमान वाहक (Aircraft Carrier), विनाशिका (destroyer), फ्रिगेट (Frigates), कार्वेटेस (Corvettes), विविध श्रेणीतील पाणबुड्या, आणि अणुइंधनावरच्या पाणबुड्या आणि इतर अति विशिष्ट नौका आहेत. 

ब्लॉग : लेख : Indian Navy Ship रणवीर Read More »

लेख – मुत्सद्दी क्रांतिकारी – रंगो बापूजी गुप्ते

Bhagwat Balshetwar / 2 Comments / July 9, 2019
लेखऐतिहासिक राजकीय लेख

रंगो बापूजी गुप्ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपल्या सर्वस्वाची आहूती दिली पण काळ ओघात त्यांची स्मृती इतिहासाच्या पटलावरून काहीशी पुसून गेली. अनेकांचे कार्य हे चमकत्या हिऱ्या प्रमाणे होते पण इतिहासाच्या पुस्तका मध्ये त्यांच्या स्मृती हरवून गेल्या आहेत. मी खूप दिवसापूर्वी एक पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकातील प्रमुख ऐतिहासिक व्यक्तिरेखेचे नाव होते “रंगो बापूजी गुप्ते”. पुस्तक

लेख – मुत्सद्दी क्रांतिकारी – रंगो बापूजी गुप्ते Read More »

ब्लॉग : लेख : खाद्य संस्कृती – वदबल

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / December 18, 2018
लेखखाद्य संस्कृती खाद्ययोग लेख

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खाद्य संस्कृती सुंदररित्या जपली जाते. मराठवाड्यात तर खाद्य संस्कृतीला विशेष महत्व आहे. एखाद्या विशिष्ट कार्य, सणा प्रसंगी एखादा विशिष्ठ पदार्थ बनवून आपण त्याचा आस्वाद घेतो. जसे की वेळा अमावस्येला भज्जी, आणि त्रिपुरारी पौर्णिमेला वदबल. कुठे ही परंपरा काटेकोरपणे पाळली जाते आणि कुठे ही प्रक्रिया ऐच्छिक आहे. पण एखाद्या सणा प्रसंगी विशिष्ठ पदार्थ सणाची गोडी वाढवतो आणि ओढ लावतो. असे पदार्थ मला तरी खूप आवडतात कारण ते कधीतरीच बनत असतात. तर अश्याच एका पदार्थाची आज उजळणी करून घेवू या.

ब्लॉग : लेख : खाद्य संस्कृती – वदबल Read More »

ब्लॉग : तीन क्रीडारत्न

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / July 21, 2018
लेखक्रीडारत्न खेळ लेख

मागचे दोन आठवडे खेळाच्या बाबतीत खूपच वैविध्यपूर्ण होते. काही सुपरस्टार खेळपट्टी वर उदयाला आले आणि काही सुपरस्टार उत्तुंग कामगिरी करण्या अगोदरच विरघळले. पण काहीनी आपली जबरदस्त छाप सोडली आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रेक्षकाची मन जिंकली आणि कृतीतून आदरच काय हृदय सुद्धा जिंकले. मला त्यातील तीन ठळक उदाहरण दिसतात.

“हिमा दास” हिने IAAF संघटनेच्या वीस वर्षा खालील ४०० मीटरच्या जागतिक स्पर्धेत भाग घेऊन स्वर्ण पदकाची कमाई केली. तिने पदक मिळवणारी भारतातील पहिली महिला बनून इतिहास रचला आहे. तिने टेम्पेरे फिनलंड इथे ही कामगिरी साकारली. हिमा दासने ४०० मीटर पार करण्यासाठी फक्त ५१.४६ सेकंद घेतले. तिची कामगिरी ही ऐतिहासिक तर आहेच पण भारतीयांना अभिमानास्पद वाटणारी आहे. त्यासाठी हिमा दास यांचे मनापासून अभिनंदन.

ब्लॉग : तीन क्रीडारत्न Read More »

← Previous 1 2 3 … 5 Next →

Photography Award 2025

FotoVision Exhibition
CTM 5th International Exhibition

'थोडं मनातलं… थोडं जनातलं…' पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे!!!

Search on Site

Categories

Archives

Site Statistic

Site Total Page View : 11025 

Statistic

Top Posts & Pages

  • ब्लॉग - लेख - उत्तर कोरिया - मीमांसा
  • किल्ले सिंहगड - ट्रेक फोटो
  • फोटोग्राफी अवॉर्ड
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • WordPress

Recent Posts

  • फोटोग्राफी – पुणे गणेशोत्सव २०२६ September 26, 2026
  • ब्लॉग: ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर एक अविस्मरणीय दिवस September 5, 2026
  • कविता: निरोप — हिरकणी 🚗 August 23, 2026
  • कविता: सावळा तो विठ्ठल उभा विटेवरी July 26, 2026
  • फोटोग्राफी : अद्वितीय पालखी सोहळा २०२६ July 12, 2026

RSS feed: RSS RSS

  • फोटोग्राफी – पुणे गणेशोत्सव २०२६
  • ब्लॉग: ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर एक अविस्मरणीय दिवस
  • कविता: निरोप — हिरकणी 🚗
  • कविता: सावळा तो विठ्ठल उभा विटेवरी
  • फोटोग्राफी : अद्वितीय पालखी सोहळा २०२६
  • ब्लॉग: INS Kavaratti आणि INS Sindhukirti – भाग २ – समुद्राच्या गर्भातील अदृश्य योद्ध्याची भेट
  • ब्लॉग : लेख : INS Kavaratti आणि INS Sindhukirti – भाग १
  1. Mahesh Purandare on ब्लॉग : चित्रपट परिक्षण – छावा – असीम शौर्य, अचाट पराक्रम आणि त्यागाची गाथा – स्पॉइलर अलर्टFebruary 27, 2025
  2. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी : फुलपाखरू – भाग २July 1, 2023
  3. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी : फुलपाखरूJuly 1, 2023
  4. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी – TATR – ताडोबा – बटरफ्लाय वर्ल्डJune 30, 2023
  5. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी : फुलपाखरूJune 30, 2023
  6. अद्वितीय अनुभव... - निवडक चारोळी – भाग ७ on निवडक चित्र चारोळी – भाग ६June 25, 2023
  7. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : भिगवण आणि मयूरेश्वर अभयारण्य on फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग ८February 19, 2023
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Blogadda

Discover latest Indian Blogs

IndiBlogHub

Top bloggers in india

Archives

Copyright © 2026 अद्वितीय अनुभव... भागवत बलशेटवार

Follow Us

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • Yourquote
Loading Comments...