कविता: बिबट्याचे मनोगत


Top post on IndiBlogger, the biggest community of Indian Bloggers

सिमेंटच्या जंगलात येण्याची नाही हौस
भरपूर पर्यटनाची मज नाही सोस
माणसा सोबत संघर्षात नाही मौज
भरपेट भोजन सुद्धा मिळत नाही रोज

सोसायटीत ओळखीचे कुणीच नाही
म्हाडात तर घर सुद्धा घ्यायचे नाही
नाशिक पाहण्यात तर मला रस नाही
माणसं भेटण्याचा मला आनंद नाही

शोधतो व्यक्तीला, जो प्रश्न सोडवेल
शोधतो स्वतःला, जिथे आनंद पसरेल
शोधतो स्वप्नांना, तिथे आसरा भेटेल
शोधतो जागेला, जिथे भोजन मिळेल

हिंस्त्र तरी अन्न साखळीचा हिस्सा
जंगल हिरावून तुम्ही दिला घुस्सा
वनक्षेत्र खालावले साखळी तुटली
आत्ता मात्र भूख सुद्धा प्रखर वाढली

नोंद: बिबट्याचे जंगल सोडून अन्ना साठी शहरात येण्याचे प्रमाण वाढले आहे. बिबट्याचे मनोगत आणि व्यथा मांडण्याचा कवितेच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे.

Photo Coutesy: Google

Views: 32

Leave a Reply