कविता / प्रकाशचित्र – अद्वितीय वारी

आनंदाचे निधान वारी
आत्म्याचे कल्याण वारी
मैलोन् मैल प्रवास वारी
आत्म्यावर प्रकाश म्हणजे वारी

कविता / प्रकाशचित्र – अद्वितीय वारी Read More »

कविता : मैत्री

शब्दा पलीकडची नि:शब्द निखळ मैत्री
दुधाच्या सायी सारखी घट्ट असते मैत्री

नदी पात्रातील प्रवाही पाण्यासारखी दोस्ती
अवगुणात चांगले गुण शोधणारी असते दोस्ती

अवखळ, अल्लड, दिलदाराची यारी
यार साठी मार खायची सुद्धा असते त-यारी

कविता : मैत्री Read More »

पश्चिमरंग – चित्रपट – द डार्क नाईट(The Dark Knight)

२००८ ला एका संध्याकाळी माझा मित्र रूमवर आला आणि एका चित्रपटा बद्दल बोलताना सांगीतले की जोकरने पूर्ण चित्रपट खाल्ला आहे. त्या वेळेस मी चित्रपट बघितला नव्हता. “हा जोकर कोण” हा विचार मा‍झ्या मनात आला होता? ज्या वेळेस जोकर साकारणार्‍या कलाकाराला (हिथ लेजर/Heath Ledger) ऑस्कर मिळाला तेव्हा मी हा चित्रपट बघितला. मला खूपच आवडला. मी १५-२० वेळेस या चित्रपटाचे पारायण केली असतील. त्या पैकी १० वेळेस मी फक्त मध्यंतरा पर्यंतच पाहीलेत. हा चित्रपट मा‍झ्या यादीत पहिल्या पाच चित्रपटात आहे. बॅटमॅन चित्रपट मालिकेतला दुसरा भाग आहे. तरी पण पहिला न बघता दुसरा चित्रपट बघितला तरी विशेष अशी उणीव जाणवत नाही आणि पहिला भाग बघितल्यास उत्तमच. आणि क्रिस्टोफर नोलन (Christopher Nolan) या अ‍वलियाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नोलन यांचे चित्रपट अफाट प्रसिद्ध आहेत. या चित्रपटाला IMDb या साईट वर पहिल्या पाच चित्रपटात तिसरे मानांकन असून समीक्षा मूल्यांकन ९.० आहे.

पश्चिमरंग – चित्रपट – द डार्क नाईट(The Dark Knight) Read More »

कविता : वासना

ही कसली सभ्यता ही कसली वासना
का होतात सारख्या-सारख्या निंद्य घटना

का होतो अन्याय का होतो अत्याचार
आणि किती निरागस पाकळ्या खूडणार?

का समजतात तिला फक्त भोगाचे शरीर
संपेल का वासनेच्या भुकेची विखारी किनार?

कविता : वासना Read More »

ब्लॉग – प्रवासवर्णन – बडोदे संमेलना निमित्त भटकंती

पूर्वतयारी
९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कवी कट्टा या काव्य मंचा साठी मी माझी कविता जानेवारीत पाठवली होती. त्यावेळेस मी काही प्रवासाचे ठरवले नव्हते. बहुतेक हा मा‍झ्या नशीबात हा प्रवास लिहिलेला असेल. माझ्या कारने मला मोठा प्रवास करता आला नाही म्हणून मग मी कारने जायचे ठरवले. मी त्यासाठी मा‍झ्या दोन मित्रांना सुद्धा विचारले पण सुट्यांच्या कारणामुळे तो प्रयत्न काही यशस्वी झाला नाही. आम्ही घरातील तिघे जाणार होतो पण ते नियोजन सुद्धा बारगळले. आपण नियोजन केल्या प्रमाणे प्रवास झाला तर तो प्रवास मजेचा थोडेच वाटतो? पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावर मग प्रवासाच्या ५ दिवस अगोदर रेल्वेचा प्रवास निश्चित केला आणि नशीबाने तिकीटे उपलब्ध होती. मग काय पटापट तिकीटे आरक्षित केली. बारा किंवा तेरा तारखेच्या घोळा मध्ये मला थेट बारा तारखेचे पुणे अहमदाबाद दुरंतो एक्सप्रेसचे तिकीट मिळाले. मग सगळे नियोजन अंबुजा सीमेंट प्रमाणे मजबूत झाले. मी तेरा तारखेला अहमदाबादला जाणार होतो आणि तेथून सोमनाथला दोन  दिवस राहणार होतो. मी फक्त सोमनाथ, दिव, आणि सासण गीर नॅशनल पार्क बघायचे नियोजन केले होते. पण एक विलक्षण योगायोग जुळून आला होता. कारण मी ज्या वेळेस कारने प्रवास करणार होतो त्यावेळेस मी जास्तीत जास्त अहमदाबाद पर्यंत जाऊन वापस येणार होतो. त्यात सोमनाथ दर्शनाच्या नियोजनाची काहीच आखणी नव्हती. पण बहुतेक ‘त्याची’ इच्छा असेल. माझा छोटासा कविता वाचनाचा कार्यक्रम होता पण पर्यटनाची संधी सोडेल तर काय कामाचे? ज्याप्रमाणे डेटा, कॉलिंग, आणि इतर एका पॅकमध्ये रिचार्ज करतो, त्याच प्रमाणे कुठेही जायचे असेल तर मी त्यात पर्यटन घुसवतोच. एकाच वेळेत ३ काम करायची सवय काही जात नाही.
दिनांक – १३ फेब्रुवारी (अहमदाबाद)तेरा तारखेला मी रेल्वेने पहाटे ६.४० ला अहमदाबाद पोहोचलो. मग आम्ही दोघं प्रतीक्षालयात गेलो आणि थोडा आराम केला. मी नाश्ता करून आलो तर राधाने(पत्नी) सांगीतले आज महाशिवरात्री आहे. मग मा‍झ्या डोक्यात प्रकाश पडला. मी सोमनाथाच्या दर्शनाची वेळ, पुढील गाडीची वेळ, हा सगळा हिशोब मांडला आणि बहुतेक माझा सगळा हिशोब चुकणार होता. माझी पुढील गाडी अहमदाबाद – सोमनाथ १०.४० ला सुटुन ८.०० ला तिथे पोहोचणार होती. मग मी विचार केला दर्शनाचा जुळून आलेला योगायोग हुकला. पण हार मानून चालणार नव्हते. मी हॉटेल मध्ये प्रवेश केल्या-केल्या मंदिराविषयी माहिती काढली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी रात्रभर मंदिर चालू राहणार होते. मग काय आम्ही तयार होऊन दीड तासात मंदिराजवळ पोहोचलो आणि मंदिरामध्ये Light And Sound कार्यक्रम चालू होता. तो बाहेरूनच ५ मिनिटे पाहीला. नेहमी प्रमाणे वाट चुकत आणि मंदिर शोधत एकदाचा नवीन मंदिरात गेलो. तर तिथे ११ वाजता आरती सुरू झाली होती मग तो ही प्रसाद पदरात पाडून शेवटी सुख कारक असे महादेवाचे दर्शन झाले. दर्शनाला दीड तास लागला परंतु अनुभव मात्र अवर्णनीय होता. एकदम नवीन मंदिर बांधले आहे आणि त्यावर सणा निमित्त रोषणाई उठून दिसत होती. Light and Sound कार्यक्रमाचा अनुभव सुद्धा एकदम छान आणि ताजातवाना करून जातो. महाशिवरात्री निमित्त मंदिर उजळून निघाले होते. जुने मंदिर बाजूलाच आहे. मग जुन्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. बहुतेक प्रवाश्याच्या जाण्या-येण्या मुळे हा परिसर गजबजला होता.

हे महादेवा…
तूच जन्म, तूच मृत्यु
तूच स्तब्धता, तूच संगीत 
तूच शक्ती, तूच भक्ती
सोमनाथा, तुला करितो वंदन

ब्लॉग – प्रवासवर्णन – बडोदे संमेलना निमित्त भटकंती Read More »

हे महादेवा…

तूच जन्म, तूच मृत्यु
तूच नृत्य, तूच गीत
तूच शक्ती, तूच भक्ती
हे शिवा… आजन्म तुझा भक्त राहीन मी

तूच निश्चल, तूच संगीत
तूच सापेक्ष, तूच निष्पक्ष
तूच कठोर, तूच कृपाळू
हे भैरवा… आजन्म तुझेच संगीत गाईन मी

हे महादेवा… Read More »