चित्रपट परीक्षण/रिव्यू : फत्तेशिकस्त : दमदार सर्जिकल स्ट्राइक

चित्रपट परीक्षण

“शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥ शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१६॥ शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥ शिवरायचे सलगी देणें । कैसे असें ॥“ शिवराया बद्दल कितीही पुस्तके लिहिली आणि कथा चित्रपटात दाखवल्या तर कमीच पडेल. राजांची प्रत्येक लढाई, पराक्रम, कर्तृत्व, माणसं जिंकण्याची कला, आणि बुद्धीबळातील अजोड चाली प्रमाणे खिंडीत गाठून शत्रूवर केलेली मात यावर चित्रपट निघू शकतो. राजांचे उत्तुंग कर्तृत्व आणि पराक्रम आभाळाच्या परीघा सारखा होता.

चित्रपट परीक्षण/रिव्यू : फत्तेशिकस्त : दमदार सर्जिकल स्ट्राइक Read More »

ब्लॉग : प्रवासवर्णन – गोवा ऑफसाईट – ३ दिवसीय ट्रीप

प्रवासवर्णन

मी मा‍झ्या (SAS R&D Ltd Pune)ऑफिसच्या ऑफसाईटच्या निमित्ताने गोव्याला गेलो होतो. 3 दिवसाचा कार्यक्रम होता. १० तारखेला गुरूवारी दुपारी 4.30 ला आम्ही रेल्वेने निघालो आणि 11 तारखेला 8.30 वाजता पोहोचलो. सकाळी एका हॉटेल मध्ये पोहे खाल्ले. पुण्या पेक्षा चवीला उत्कृष्ट पोहे गोव्यात खाल्याने सुखद अनुभव दिला. (फॉरचून अक्रॉन रेजिना) हॉटेल रूम भेटायला वेळ असल्याने आम्ही पटापट अ‍ॅक्टिवा भाड्याने घेतल्या आणि तडक उत्तर गोव्यातील (Vegator Beach) वेगटोर बीच कडे कूच केले. छोटे रस्ते, प्रदूषण मुक्त हवा, आजूबाजूला हिरवीगार शेती, आमच्या कडे बघून प्रसन्न पणे हसणारा सूर्य आणि कमी वर्दळ यामुळे अ‍ॅक्टिवाचा प्रवास सुखद होता. सकाळची वेळ, कमी उकाडा आणि शांत रस्ता त्यामुळे एका तासांतच आम्ही तिथे पोहोचलो. बीचच्या बाजूला चपोरा किल्ल्याचे(Chapora Fort) आधी दर्शन घेतले. हा किल्ला एका टेकडीवर वसलेला आहे. त्यात एका बाजूला समुद्र आणि दुसर्‍या बाजूला हिरवीगार झाडी. पण महाराष्ट्राच्या किल्ल्या एवढी भव्यता तिथे जाणवली नाही. किल्ला चढताना मात्र माझी दमछाक झाली. प्रवासात उलटी सदृश्य मळमळ झाल्यामुळे गटागट नारळाचे पाणी पिले आणि पाण्याची एक बाटली भरून घेतली. मी प्रवासात डिहायड्रेट (dehydrate) होणार नाही याची काळजी घेतो. फोटोग्राफी साठी एक अतिशय उत्तम जागा आहे. उंचा वर असल्यामुळे चारही दिशेचे फोटो काढायला सुखद अनुभव होता. किल्ला उतरल्या नंतर आम्ही वेगटोर बीचला गेलो. सुंदर आणि शांत बीच होता. दुपारची वेळ असल्याने वर्दळ कमी होती. जीन्स असल्याने मी काही जास्त पाण्यात गेलो नाही. पण दुसऱ्यांनी समुद्र स्नानाचा आनंद लुटला. तेथून आम्ही लंच साठी २.३० ला हॉटेलला पोहोचलो. लंच करून आराम केला आणि सूर्यास्त बघायचे ठरवले. सूर्यास्तासाठी बीचवर पोहोचायला उशीर झाला. पण सूर्यास्त एन्जॉय करून परत ऑफिस पार्टी मध्ये एन्जॉय केला. बाघा बीच बघून अश्या रीतीने गाणी गुणगुणत पहिला दिवस संपला.

ब्लॉग : प्रवासवर्णन – गोवा ऑफसाईट – ३ दिवसीय ट्रीप Read More »

निवडक चित्र चारोळी – भाग ५

कविता

निवडक चित्र चारोळी  निवडक चित्र चारोळी – भाग २  निवडक चित्र चारोळी – भाग ३ निवडक चित्र चारोळी – भाग ४ Views: 165

निवडक चित्र चारोळी – भाग ५ Read More »

कविता: बिबट्याचे मनोगत

कविता

सिमेंटच्या जंगलात येण्याची नाही हौस
भरपूर पर्यटनाची मज नाही सोस
माणसा सोबत संघर्षात नाही मौज
भरपेट भोजन सुद्धा मिळत नाही रोज

कविता: बिबट्याचे मनोगत Read More »

कविता: आज्जी माझी…

कविता

आज्जी माझी…   आभाळभर माया, आठवणींच्या सुरकुत्या प्रखर बुद्धीची प्रभा, अंगी विशिष्ट कला आज्जी माझी… मायेची पाखर, उडून गेली दूरवर परी आठवण नाही पुसली कदापि आज्जी माझी… संवादातून प्रेमाचे ऋणानुबंध जोडले भेटीत स्नेहच जपले, हेच संचित साधले आज्जी माझी… कधी प्रसंगातून शब्दाविनाच सुटले, डोळ्यातून अश्रु अर्धवट ओघळले, प्रयत्नांत कधी धडपडले, घडले परी मी किंचित नाही

कविता: आज्जी माझी… Read More »

चित्रपट परीक्षण/रिव्यू : “सुपर ३०” : एक हुकलेला षटकार – स्पॉईलर अलर्ट

चित्रपट परीक्षण

चित्रपट परीक्षण/रिव्यू – “सुपर ३०” – एक हुकलेला षटकार हा चित्रपट बघताना मला ३ इडियट, चक दे इंडिया आणि इंग्लीश चित्रपट “मिॅरकल” या प्रेरणादायी चित्रपटाची आठवण होते. “मिॅरकल” हा अमेरिकन आईस हॉकी वर आधारित एक सुंदर चित्रपट आहे. एकंदर कथा चांगली आहे. “सुपर ३०” चित्रपटाची कथा सरळ साधी आणि सोपी आहे “शिक्षण सम्राट आणि जाती व्यवस्था विरुद्ध

चित्रपट परीक्षण/रिव्यू : “सुपर ३०” : एक हुकलेला षटकार – स्पॉईलर अलर्ट Read More »