चित्रपट परिक्षण – पद्मावत – स्पॉयलर अलर्ट

भव्य आणि उंच देखावे आणि सेट्स, उंची वस्त्र, कलाकारांची दमदार फळी आणि अभिनय, उत्तम छायाचित्रण आणि संवाद घेतलेली विशेष मेहनत चित्रपटात जाणवते. चित्रपटाचे पार्श्वसंगीत श्रवणीय आणि प्रभावी आहे. रजपूत लोकांची अस्मिता, लढाऊ बाणा, त्यांचा संयम, प्रथा आणि दिलदारपणा यांचा चित्रपटावर विशेष प्रभाव जाणवतो. संजय लीला भन्साळी यांचे दिग्दर्शन आणि त्यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. कोणताही चित्रपटाची कल्पना आणि पात्र आधी दिग्दर्शकाच्या विचारात आणि डोक्यात उतरतात त्याचं प्रमाणे सगळी कथा भन्साळी यांच्या दिग्दर्शनात दिसून येते.

चित्रपट परिक्षण – पद्मावत – स्पॉयलर अलर्ट Read More »

छंद आणि प्रश्न

वाटते स्वत:च्या आत कथेसाठी पात्र शोधावे 
कुंभारा प्रमाणे भूमिकेला स्वत: घडवावे

कथेतील भांडणात उगीच का पडावे
पु.लं. प्रमाणे अमृत कण कसे शिंपडावे?

छायाचित्रातील व्यक्तीशी हितगुज करावे
कधी चित्रकारा सारखे छायाचित्र रेखाटावे

छंद आणि प्रश्न Read More »

आजींची खोली

ना भावनेचा हुंकार, ना श्वसनाचा अंहकार
ना शब्दाचे उच्चार, ना इच्छेचा आविष्कार

खोली सुनसान, अडगळीचे सामान
कोपर्‍यात छायाचित्र, मुक्तीचे साधन

श्वास अडकला होता, कोंडले होते क्षण
तुटले होते व्यासपीठ, सांडले सोन्याचे कण

आजींची खोली Read More »