भेटला का वेळ दादा तुला

जगण्याच्या फाफटपसाऱ्यात विसरू नको मला
लहानपणीच्या लुटू पुटु खेळाची शपथ तुला
आठवतो का बघ आपण बांधलेला किल्ला
संवाद अखंड राहावा हे सांग स्वत:ला
जीवनाचे रहाटगाणे प्रवाही
वेळेचा मोबदला मिळेल तुला…
चल सुख दुःखाच्या गोष्टी सांगू एकमेकाला
भेटेल का वेळ दादा तुला….
काय सांगू अडकलो मोहजालात
स्वत:शी संवादाला वेळ नाही मला
तुझ्या आठवणीचा झरा वाहतो निरंतर
कधीच येणार नाही नात्यात अंतर
मा‍झ्या प्रिय बहि‍णीस अर्पण

Views: 18

Leave a Reply