छंद आणि प्रश्न

वाटते स्वत:च्या आत कथेसाठी पात्र शोधावे 
कुंभारा प्रमाणे भूमिकेला स्वत: घडवावे

कथेतील भांडणात उगीच का पडावे
पु.लं. प्रमाणे अमृत कण कसे शिंपडावे?


छायाचित्रातील व्यक्तीशी हितगुज करावे
कधी चित्रकारा सारखे छायाचित्र रेखाटावे

त्यात स्वत:च वेगवेगळे मुद्रा, भाव भरावे
निसर्गा प्रमाणे फक्त मुक्तरंग कसे उधळावे?


इतिहासातील खाणाखुणा काढत फिरावे
युद्धातील असामान्य शौर्य परत आठवावे

शिवाजीच्या वीर मावळ्या प्रमाणे लढावे
लिखाण, छायाचित्र, इतिहास क्षेत्र कसे गाजवावे?

Visits: 12

Leave a Reply