कविता / प्रकाशचित्र – अद्वितीय वारी

आनंदाचे निधान वारी
आत्म्याचे कल्याण वारी
मैलोन् मैल प्रवास वारी
आत्म्यावर प्रकाश म्हणजे वारी

एकच ध्यास वारी
पंढरीची आस वारी
एकच अट्टहास वारी
धगधगती भक्तीची ज्योत वारी

माऊलीचा गजर वारी
भक्तांचा कुंभमेळा वारी
समाज प्रबोधन वारी
जगण्याचा आधार म्हणजे वारी

वैष्णवांंचा मेळा वारी
उत्साहाचा झरा वारी
भक्तीचा मळा वारी
माऊलीचा स्पर्श म्हणजे वारी

अखंड नामाचा गजर वारी
व्यवस्थापनाचा कळस वारी
सामाजिक सलोखा वारी
अमृतकणांचा वर्षाव म्हणजे वारी

मानवतेचे उत्तुंग दर्शन वारी
निरपेक्षपणाचे लक्षण वारी
अध्यात्माचे सुगम दर्शन वारी
संताचे पवित्र अधिष्ठान म्हणजे वारी

 

प्रकाशचित्र :

प्रचि – पाऊले चालती पंढरीची वाट
प्रचि – दिंडी
प्रचि – पालखीची ओढ
प्रचि – आपलेच ओझे आपणच वहावे
प्रचि – वाट माझी एकट्याची
प्रचि – दिंडी मालट्रक
प्रचि – आपलेच ओझे आपणच वहावे
प्रचि – तिलक
प्रचि – पाऊले चालती पंढरीची वाट
प्रचि – पाऊले चालती पंढरीची वाट
प्रचि – सात्वन
प्रचि – स्वयंसेवक
प्रचि – भेटीची आस
प्रचि – व्यवसाय
प्रचि – माऊली आणि विठोबा
प्रचि – दिंडी १३४
प्रचि – वाटप मंडप
प्रचि – भजन
प्रचि – एक वारकरी लाख वारकरी
प्रचि – एक भाव
प्रचि – मुद्रा
प्रचि – तुळस
प्रचि – कुतुहूल
प्रचि – मुद्रा
प्रचि – पालखीची वाट
प्रचि – पालखीची प्रतीक्षा
प्रचि – पालखीची प्रतीक्षा

शब्द : प्रकाशचित्र – Photo प्रचि – Photo

Visits: 5545

Leave a Reply