अनुभववर्णन – TATR – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प

फोटोग्राफी – TATR – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – वाघ

मी कविता सादरीकरण्या साठी “९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला” जाणार होतो. तर सहजच यवतमाळच्या जवळपास पर्यटन साठी काय आहे त्या दृष्टीने मी शोध घेतला आणि मला आठवले त्याच भागात “तो” राहतो. त्याचा वावर 600 वर्ग किलोमीटरचा आहे. त्याला भेटायची भीती वाटते पण बघायला हरकत नसावी. त्यामुळे मी ताडोबाची जंगल सफारी आरक्षित केली.

सफारीत काढलेले फोटो बघत होतो आणि समोरून झरकन वाघाचा फोटो आला. फोटो खाली सरकत होते आणि आठवणी डोळ्या पुढून झरकन जात होत्या. तुम्हाला ३ तासाचा साहसी दृश्याचा, रोमांटीक, रोमांचित, ड्रामा, असलेला चित्रपट बघायचा असेल तर एकदा नक्की ताडोबाच्या जंगलात जाऊन या. माझी सफारीची वेळ दुपारी २.३० – संध्याकाळी ६ पर्यंत होती. मी ठीक दुपारी १२.०० वाजता ताडोबाला पोहोचलो. मग राहण्याच्या व्यवस्थे बद्दल चौकशी केली. दोन – तीन हॉटेल मध्ये फेरफटका मारून आलो. आणि काही होम स्टे सुद्धा बघितले. त्या पैकी एक उत्तम वाटला. खाण्याची आणि राहण्याची AKSKA’S या होम स्टे मध्ये उत्तम व्यवस्था होती. त्यांना सांगीतले की आम्ही संध्याकाळी ६.३० वाजता येतो.

बरोबर २.०० वाजता मोहुर्ली गेट वर पास तपासणी प्रक्रिया सुरू झाली. पु.ल. देशपांडे म्हणाले होते “रेल्वे प्रवास करताना जागा शोधत ते गार्डाच्या डब्ब्या जवळ पोहोचतात आणि परत पुन्हा शोधत आरक्षित जागेपाशी पोहोचतात” त्याप्रमाणे आमचे आधार कार्ड शोधा शोध करण्यात आणि तपासणी साठी देण्यात लवकर पोहोचून सुद्धा शेवटून दुसरा नंबर लागला. मागच्या वर्षी मी गीर राष्ट्रीय अभयारण्याला भेट दिली होती. पण त्यावेळेस सफारीत “सिंह” काही दिसला नव्हता. त्यामुळे ताडोबा सफारीत मन थोडे आशंकित होत होते की आज तरी जंगलाचा राजा “वाघ” दिसेल का? पण यावेळेस माझ्या साठी लक्की असलेली माझी आई सोबत होती त्यामुळे थोडी आशा होती.

आम्ही ओपन जिप्सी मध्ये विराजमान झालो आणि गाडी सुरु झाली. थोडे पुढे गेल्या नंतर एक चेकपोस्ट लागला. तिथे थोडा वेळ ड्रायव्हरने एन्ट्रीच्या नावाखाली मित्रा सोबत टाइमपास केला. आणि आम्ही पुढे मार्गस्थ झालो. मग आत्ता मेन रस्ता सोडून जंगलाचा कच्चा रस्ता सुरू झाला. मी गाईडला विनंती केली की वाघ बघण्याला प्राधान्य देऊया. ज्या ठिकाणी वाघ दिसण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे तिकडे आपण जाऊ या. बाकी दुसर्‍या गोष्टी साठी कमी प्राधान्य देऊया. आपल्याला वाघ बघण्याची एकही संधी सोडायची नाही.

बऱ्याच म्हणीचा प्रत्यय येणार हे मला सफारीत माहीत नव्हते. गाईडला समजल्या नंतर गाईड ट्रक ड्रायव्हर प्रमाणे दुसऱ्या जिप्सीतील गाईडशी सांकेतिक भाषेत, खाणाखुणा करून माहिती गोळा करत होता. त्याने दोन जाणाऱ्या आणि येणाऱ्या जिप्सी ड्रायव्हर कडून माहिती काढायचा प्रयत्न केला. असाच अर्धा तास गेला तर त्या अर्धा तासात आम्ही घुब्बड बघितला. झाडाचा आवाज जरी झाला तरी आम्ही लक्ष देऊन ऐकत होतो. उत्सुकता हळूहळू वाढत होती. तेवढ्यात मला समोर झाडाखाली हालचाल जाणवली आणि मी गाईडला सांगीतले. महाशय झाडा खाली अंग चोरून पाय दुमडून ऊन सोसत समोरील दृश्याचे बारीक निरीक्षण करत होता. समोर नदीच्या बाजूला हरिणाचा कळप चरत होता. “सावाजासाठी घात लावून बसणे” म्हणजे काय हे समोरच्या वाघाला बघून कोणीही सांगीतले असते. मी भरपूर फोटो काढल्या. विविध प्रकारच्या फोटो काढल्या. वाघ पाठमोरा होता त्यामुळे समोरून काही फोटो काढता आल्या नाहीत. फोटो काढण्याच्या नादात मी व्हिडिओ चित्रीकरण करायला विसरलो. आमची जिप्सी थांबल्या बरोबर मागच्या २ जिप्सी सुद्धा थांबल्या. आणि थोडा आवाज वाढला. त्यामुळे वाघाला निरीक्षणास व्यत्यय आला. वाघाने अंग झटकले. बहुतेक ही माणसे सुधारणार नाहीत असे म्हणून झाडीत गेला. वाघोबा थोडाच वेळात कुठे गायब झाले हे कळलेच नाही. मग आमची अस्वस्थता वाढली. पण तेवढ्यात जंगलातील कॉल सुरु झाले. हरिणांनी कान टवकारून अति सावध झाले आणि चरणे सोडून दिले. कुठून हल्ला होईल याची शाश्वती नव्हती. सावज आणि शिकारी दोन्ही सावध होते. पण बहुतेक वाघाने शिकारीचा पर्याय टाळला. वाघ नदीकडे पाणी पिण्यासाठी गेला. आमचा हिरमोड झाला. पण पाणी पिऊन वाघ परत दुसर्‍या दिशेला चालला. तेवढ्यात मला गाईडने सांगीतले आत्ता व्हिडिओ शूटिंग करा. पण वाघाला बघण्याच्या नादात मी व्हिडिओ करायचा विसरलो. त्यानंतर गाईडने माझा कॅमेरा काढून स्वतः व्हिडिओ शुटिंग सुरू केले. ५ मिनिटात वाघ जंगलात गडप झाला. आम्हाला वाटले की वाघेश्वराचे दर्शन संपले आणि परत पुढील जंगल पाहण्यासाठी जावे लागेल.

पण आमचा गाईड माहीर निघाला त्याने आम्हाला थोडी माहिती सांगितली. वाघाचे क्षेत्र २५ किलोमीटर पर्यंत असते. वाघ स्वत:चे क्षेत्र अबाधित ठेवण्यासाठी कश्या प्रकारे झाडावर खुणा करतो. त्याने अंदाज वर्तवला ज्या अर्थी वाघ नदी कडेच्या मार्गाने निघालाय त्या अर्थी तो नदीच्या दुसर्‍या कडेला नाल्या कडून बाहेर पडेल. आमची जिप्सी २-३ किलोमीटर पुढे जाऊन नाल्याच्या पुढे जाऊन थांबली. आमच्या गाईडचा विश्वास बघून १ कॅनटर बस, तीन-चार जिप्सी आमच्या मागे आल्या. प्रत्येकांनी आपली जागा घेतली. “अनुभव कशाशी खातात” यांचा अनुभव आला. 


आणि १० मिनिटातच वाघाचे आगमन झाले. शेवटी अनुभवाचे बोल खरे ठरले. आम्ही आणि वाघ यांच्यात फक्त १० फुटाचे अंतर होते. वाघाचे कसे आगमन होते? काय राजेशाही थाट, राजबिंड रूप, बेफिकीर, रुबाबदार, डोलत, आरामात, जगाची पर्वा न करता आपल्याच धुंदीत चालत येत होता. सर्कशीतला वाघ आणि जंगलातील वाघ यांच्या तील फरक त्यांच्या चालण्यावरून कळतोच. पट्टेदार वाघाची कातडी उन्हात चमकत होती. पारदर्शक डोळे, डोळ्यात बेफिकीरी, हिरो च्या एन्ट्रीची झलक वाघाच्या चालण्यात दिसली. उगाच जंगलाचा राजा का म्हणतात याची प्रचिती आली. एखादा हिरो आल्या नंतर फोटोचा क्लिचक्लिचाट होतो त्याप्रमाणे फोटोचा पाऊस पडला. पण खरा हिरो त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातो. लोक फोटो काढत होते आणि व्हिडिओ शुटींग करत होते. फोटो न काढता फक्त बघत राहावे अस वाटत होत. पण मी मात्र बलदंड वाघाचे आगमन पाहण्यात व्हिडिओ शुटींग परत विसरलो. पण ते क्षण डोळ्यांनी कायमचे साठवलेले आहेत. परतीच्या प्रवासात कोणी जास्त बोलले नाही. सहा वाजायच्या आत आम्ही वापस गेट वर आलो. एका रोमांचकारी सफारीत वाघाला बघितल्याचे समाधान होते.

दुसऱ्या दिवशी परत सकाळी एक जिप्सी सफारी होती. पण सकाळच्या कडकडीत थंडीत वाघेश्वर आमच्यावर काही प्रसन्न झाले नाहीत. आम्ही सकाळी १० ला सफारी संपवून वापस आलो तरी आम्हाला काही व्याघ्रदर्शन झाले नव्हते. आमच्या जिप्सी नंतर २ मिनिटात २ जिप्सी आल्या त्यांना मात्र फक्त २ मिनिटे अगोदर वाघ दिसला होता. आम्ही २ मिनिट लवकर आल्यामुळे आम्हाला दिसला नव्हता. ताडोबात एका ठिकाणी लिहिले होते की “तुम्हाला वाघ दाखवायची शाश्वती कोणीही देणार नाही पण तीच तर खरी मज्जा आहे.” हे वाक्य मनोमन पटले होते.

 

ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व - TATR - ऑफिस
 फोटो – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – ऑफिस 
ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व - TATR - रस्ता
फोटो – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – रस्ता
ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व - TATR - स्तंभ
फोटो – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – स्तंभ
ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व - TATR - वृक्ष
फोटो – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – झाड
ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व - TATR - पाटी
फोटो – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – पाटी
ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व - TATR - घुब्बड
फोटो – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – घुब्बड
फोटो - ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व - मुद्रा
फोटो – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – मुद्रा 
ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व - TATR - हरीण
फोटो – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – बारासिंगा
ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व - TATR - मोर
फोटो – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – मोर
ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व - TATR - पक्षी
फोटो – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – पक्षी
ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व - TATR - मोर
फोटो – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – मोर
ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व - TATR - team
फोटो – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – Documentry टीम माया वाघ
ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व - TATR - मगर
फोटो – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – मगर
ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व - TATR - जंगली कुत्रा
फोटो – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – जंगली कुत्रा
ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व - TATR - जंगली कुत्रा
फोटो – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – जंगली कुत्रा 
ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व - TATR - आई वडील
फोटो – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – आई वडील
ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व - TATR - driver
फोटो – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – Driver
फोटो – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व
ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व - TATR - सूर्योदय
फोटो – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – सूर्योदय
ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व - TATR - पक्षी
फोटो – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – पक्षी
ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व - TATR - हरण
फोटो – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – हरीण
ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व - TATR - गाय
फोटो – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – गाय
ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व - TATR - पक्षी
फोटो – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व –  Red-wattled Lapwing

Visits: 63

0 thoughts on “अनुभववर्णन – TATR – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प”

  1. Pretty great post. I simply stumbled upon your weblog and wished to mention that
    I have really loved surfing around your blog posts.
    In any case I will be subscribing on your rss feed and I hope you write
    again soon!

Leave a Reply