Skip to content
Bhagwat Balshetwar
अद्वितीय अनुभव...

मराठी कथा, कविता, लेख, चित्रपट परीक्षण, प्रवासवर्णन, फोटोग्राफी, पुस्तक, कोट्स, आणि इतर साहित्य

  • कथा
    • लघु कथा
    • शत शब्द कथा
  • कविता
    • चित्र चारोळी
    • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – कविकट्टा
  • लेख
    • व्यक्ती विशेष
  • प्रवासवर्णन
  • चित्रपट परीक्षण
  • फोटोग्राफी
    • पक्षी फोटोग्राफी
    • फोटोग्राफी – गणेशोत्सव
  • कोट्स
  • पुस्तक
    • वडिलांची प्रकाशित साहित्य संपदा
  • इतर साहित्य
  • About
    • क्षणचित्रे आणि समारंभ
    • फोटोग्राफी अवॉर्ड
    • Privacy Policy
Bhagwat Balshetwar
अद्वितीय अनुभव...

मराठी कथा, कविता, लेख, चित्रपट परीक्षण, प्रवासवर्णन, फोटोग्राफी, पुस्तक, कोट्स, आणि इतर साहित्य

  • कथा
    • लघु कथा
    • शत शब्द कथा
  • कविता
    • चित्र चारोळी
    • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – कविकट्टा
  • लेख
    • व्यक्ती विशेष
  • प्रवासवर्णन
  • चित्रपट परीक्षण
  • फोटोग्राफी
    • पक्षी फोटोग्राफी
    • फोटोग्राफी – गणेशोत्सव
  • कोट्स
  • पुस्तक
    • वडिलांची प्रकाशित साहित्य संपदा
  • इतर साहित्य
  • About
    • क्षणचित्रे आणि समारंभ
    • फोटोग्राफी अवॉर्ड
    • Privacy Policy

लॉकडाउन – सोशल मिडिया वर प्रभावशाली व्यक्ती

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / June 11, 2020
लेख#Bhagwatलिखाण लेख लॉकडाऊन

लॉकडाउन – सोशल मिडिया वर प्रभावशाली व्यक्ती  लॉकडाउनचा आत्ता ५.० टप्पा चालू आहे. या टप्यात भरपूर मोकळीक मिळाली आहे. पण या अगोदरच्या टप्प्यात पुष्कळ प्रमाणात निर्बंध होते. टीव्हीवर सगळी कडे करोना बाबत नकारात्मक वातावरण होते. त्याच-त्याच बातम्या बघून कंटाळा यायचा. मी टीव्ही वर त्याच-त्याच ब्रेकिंग न्यूज बघणंच सोडून दिले. कोणाला बाहेर जाऊन बोलता येत नव्हते. […]

लॉकडाउन – सोशल मिडिया वर प्रभावशाली व्यक्ती Read More »

ब्लॉग – व्यक्तीविशेष – माझी आई

Bhagwat Balshetwar / 4 Comments / May 1, 2020
लेखआई कुटुंब लेख व्यक्तीविशेष

देव, निसर्ग तुम्ही जन्मल्यानंतर पालन पोषणासाठी सोय करत असतो. देवाने तुम्हाला पाठवण्या अगोदर एक विशेष देवदूताची नेमणूक केलेली असते. तुम्ही जन्माला आल्यापासून तो देवदूत तुमचे पालन पोषण करत असतो. देवाने खास नेमणूक केलेल्या देवदूताचे नाव आहे “आई”. माणसाचा जीवनपट खुप मोठा असतो. माणसाच्या भावभावना, आचार, विचार, अनुभव, आनंद, दु:ख तुम्ही शब्दबद्ध करू शकता पण त्या हुबेहूब कागदावर उमटतील याची काही शाश्वती नाही. तरी मी मा‍झ्या आईच्या जीवनातील काही क्षणांचे प्रगटीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे.

ब्लॉग – व्यक्तीविशेष – माझी आई Read More »

लेख – “देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी।तेणें मुक्ति चारी साधियेल्या॥”

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / April 11, 2020
लेखअभंग लेख हरिपाठ

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतवाणी ने पावन झालेल्या हरिपाठा मधील हा पहिलाच अभंग आहे. माऊलीचे गुणगान करताना शब्द आणि भावना कमी पडतील. माऊली म्हटले की अंत:करणातील उत्तुंग चांगले भाव उचंबळून येतात. माऊली आपले अंत:करण व्यापून टाकतात. हरिपाठाचा हा अभंग मला अतिशय आवडतो पण पहिल्यांदा मला कोडे पडले होते की मंदिराच्या फक्त दारात उभे राहिले तरी तुम्हाला मुक्ती भेटते. आपण मंदिरात दर्शन करून आल्यावर मंदिरात बसतो. पण त्यामुळे प्रत्येकाचे कल्याण होईलच असे नाही. पण आपण मंदिरात इतक्यांदा जाऊन आपल्या किंवा कोणालाही मुक्ती मिळत नाही हा प्रश्न मला कित्येकदा पडला होता. कारण आपण वरवर विचार करतो. या अभंगाचा काय किंवा कोणत्याही अभंगाचा ऊहापोह करण्याचा आपल्याला अधिकार आणि प्रयोजन नाही. पण आपल्या परीने अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करू शकतो.

लेख – “देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी।तेणें मुक्ति चारी साधियेल्या॥” Read More »

ब्लॉग : लेख : Indian Navy Ship रणवीर

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / December 8, 2019
लेखनेव्ही लेख

लहानपणा पासून मला भारतीय सैन्य आणि नौदल बद्दल प्रचंड आकर्षण होत. मी लहानपणी सातारा सैनिक स्कुल साठी परीक्षा सुद्धा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी मी विशेष क्लासेस सुद्धा लावले होते. परंतु मी सातारा सैनिक स्कुल प्रवेश परीक्षा काही चांगल्या मार्काने पारित होऊ शकलो नाही. पण एखादा आर्मी/नौदल ऑफिसर भेटल्या नंतर त्यांचा पोशाख, चालण्यात एक प्रकारचा रूबाब, आणि बोलण्यात आत्मविश्वास बघून भारतीय नौदला बद्दल प्रचंड आदर आणि आकर्षण वाटते. मला भारतीय नौदला विषयी जाणून घ्यायला खूप आवडते. भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. भारतीय नौदला कडे अत्याधुनिक युद्धनौका, विमान वाहक (Aircraft Carrier), विनाशिका (destroyer), फ्रिगेट (Frigates), कार्वेटेस (Corvettes), विविध श्रेणीतील पाणबुड्या, आणि अणुइंधनावरच्या पाणबुड्या आणि इतर अति विशिष्ट नौका आहेत. 

ब्लॉग : लेख : Indian Navy Ship रणवीर Read More »

लेख – मुत्सद्दी क्रांतिकारी – रंगो बापूजी गुप्ते

Bhagwat Balshetwar / 2 Comments / July 9, 2019
लेखऐतिहासिक राजकीय लेख

रंगो बापूजी गुप्ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपल्या सर्वस्वाची आहूती दिली पण काळ ओघात त्यांची स्मृती इतिहासाच्या पटलावरून काहीशी पुसून गेली. अनेकांचे कार्य हे चमकत्या हिऱ्या प्रमाणे होते पण इतिहासाच्या पुस्तका मध्ये त्यांच्या स्मृती हरवून गेल्या आहेत. मी खूप दिवसापूर्वी एक पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकातील प्रमुख ऐतिहासिक व्यक्तिरेखेचे नाव होते “रंगो बापूजी गुप्ते”. पुस्तक

लेख – मुत्सद्दी क्रांतिकारी – रंगो बापूजी गुप्ते Read More »

ब्लॉग : लेख : खाद्य संस्कृती – वदबल

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / December 18, 2018
लेखखाद्य संस्कृती खाद्ययोग लेख

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खाद्य संस्कृती सुंदररित्या जपली जाते. मराठवाड्यात तर खाद्य संस्कृतीला विशेष महत्व आहे. एखाद्या विशिष्ट कार्य, सणा प्रसंगी एखादा विशिष्ठ पदार्थ बनवून आपण त्याचा आस्वाद घेतो. जसे की वेळा अमावस्येला भज्जी, आणि त्रिपुरारी पौर्णिमेला वदबल. कुठे ही परंपरा काटेकोरपणे पाळली जाते आणि कुठे ही प्रक्रिया ऐच्छिक आहे. पण एखाद्या सणा प्रसंगी विशिष्ठ पदार्थ सणाची गोडी वाढवतो आणि ओढ लावतो. असे पदार्थ मला तरी खूप आवडतात कारण ते कधीतरीच बनत असतात. तर अश्याच एका पदार्थाची आज उजळणी करून घेवू या.

ब्लॉग : लेख : खाद्य संस्कृती – वदबल Read More »

ब्लॉग : तीन क्रीडारत्न

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / July 21, 2018
लेखक्रीडारत्न खेळ लेख

मागचे दोन आठवडे खेळाच्या बाबतीत खूपच वैविध्यपूर्ण होते. काही सुपरस्टार खेळपट्टी वर उदयाला आले आणि काही सुपरस्टार उत्तुंग कामगिरी करण्या अगोदरच विरघळले. पण काहीनी आपली जबरदस्त छाप सोडली आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रेक्षकाची मन जिंकली आणि कृतीतून आदरच काय हृदय सुद्धा जिंकले. मला त्यातील तीन ठळक उदाहरण दिसतात.

“हिमा दास” हिने IAAF संघटनेच्या वीस वर्षा खालील ४०० मीटरच्या जागतिक स्पर्धेत भाग घेऊन स्वर्ण पदकाची कमाई केली. तिने पदक मिळवणारी भारतातील पहिली महिला बनून इतिहास रचला आहे. तिने टेम्पेरे फिनलंड इथे ही कामगिरी साकारली. हिमा दासने ४०० मीटर पार करण्यासाठी फक्त ५१.४६ सेकंद घेतले. तिची कामगिरी ही ऐतिहासिक तर आहेच पण भारतीयांना अभिमानास्पद वाटणारी आहे. त्यासाठी हिमा दास यांचे मनापासून अभिनंदन.

ब्लॉग : तीन क्रीडारत्न Read More »

ब्लॉग : “कार” पुराण – भाग ३

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / June 25, 2018
लेखअनुभव कार लेख

याचं महिन्यात १ तारखेला बलेनोचे(कार) १ वर्ष पूर्ण झाले. तसे मी या अगोदर “कार” पुराण या मालिकेत दोन भाग लिहिले आहेत. तर गाडीला १ वर्ष पूर्ण झाल्या बद्दल आणि त्यावरील अनुभवा साठी तिसरा भाग लिहायला काहीच हरकत नाही. नाही का?

मा‍झ्या सोसायटी मध्ये मी दररोज थोडा वेळ चालतो. एक दिवस मला लाल रंगाची बलेनोची गाडी चमकत असताना दिसली. दुसर्‍या वेळेस कार मालक त्या गाडीची एकदम आत्मीयतेने पोलिश लावून पुसत होता. गाडी एकदम चकाकत होती. दररोज अर्धा तास तो गाडी स्वच्छ करतो. त्यामुळे त्याची गाडी एकदम टापटीप असते. त्याचे कार सोबत एक खास जवळीक किंवा बंध जाणवले. तशी मला कधी भावनिक आत्मीयता जाणवली नाही कार सोबत. कारण मी कधीच गाडी स्वत: धुतली नाही आणि कधी वेळच दिला नाही गाडी चालवण्याशिवाय. तसे गाडीला सुद्धा भावना असतात हे सप्रमाण सिद्ध होते कारण लॉरा, पिंटो कारच्या पाठीमागे इमोशन(Emotion) असे लिहिले आहे. बऱ्याच कार वर माझी कार (My Car) असे लिहिलेले असते. माझी कार (My Car) नावाचा वितरकच पुण्यात आहे.

ब्लॉग : “कार” पुराण – भाग ३ Read More »

ब्लॉग – व्यक्तीविशेष – “मोठे अण्णा”

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / June 4, 2018
लेखलेख व्यक्तीविशेष

राजारामराव (आजोबा) आणि सुभद्रा बाई (आज्जी) यांच्या विवाह वेदीवर प्रकाश हे पहिले अपत्य फुलले. प्रकाश अण्णाची (मोठे मामा) यांची ७५व्या वर्षा निमित्त शर्करा तुला या महिन्याच्या दोन तारखेला उदगीर येथे पार पडली. सगळे त्यांना प्रेमाने “मोठे अण्णा” म्हणतात. तुला करताना मी फोटो काढत होतो. त्याच्या हातात बालाजीचा फोटो आणि डोळ्यात आनंदाअश्रूंनी दाटी वाटी केलेली होती. जसे तुलेचे पारडे समांतर झाले तसे एका क्षणात डोळ्यातून दोन आनंदाअश्रु टपकन ओघळले आणि भावनेच्या समुद्रात लुप्त झाले. ते आनंदाअश्रु नव्हते ते कृतार्थ आणि कृतज्ञ जीवनाचे सार होते. जन्म भर कष्ट घेतल्याचे आणि त्या गोष्टीचे चीज झाल्याचे चेहर्‍यावर अकस्मात भाव उमटले. त्यांचा मा‍झ्या माहितीतील आणि आठवणीतील जीवन पट समोरून झरकन स्पर्शून गेला. एखाद्या माणसाचा जीवन पट तुम्ही तराजूत तोलू शकत नाही. त्याच प्रमाणे २ पानात माणसाचे आयुष्य मांडू शकत नाही. जवळपास ५१ वर्षा खाली मोठ्या अण्णाचा विवाह निर्मला यांच्याशी संपन्न झाला. आमच्या मातोश्री आणि मोठे अण्णा यांच्या मध्ये जवळपास १४ वर्षाचे अंतर असल्यामुळे माझी आई त्यांना वडील बंधु न समजता पित्रतुल्यच मानते. तो विश्वास अण्णांनी आज ही हृदयात जपून ठेवलाय.

ब्लॉग – व्यक्तीविशेष – “मोठे अण्णा” Read More »

ब्लॉग – लेख – उत्तर कोरिया – मीमांसा

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / May 6, 2018
लेखआंतरराष्ट्रीय जागतिक घडामोडी राजकीय लेख

एखादा गुंड किंवा द्वाड मुलगा जो प्रत्येक अरे ला कारे करतो आणि कारण नसताना धिंगाणा घालतो अचानक तो जर समजूतदारपणे वागायला लागला तर आपल्याला नवल वाटते. त्या कडे आपण संशयाने पाहतो. असेच काहीसं “किम जोंग-अन” या उत्तर कोरियाच्या हुकूमशहा बद्दल झाले आहे. मी काही आंतरराष्ट्रीय घडामोडीचा जाणकार नाही पण या घटनेकडे एक सामान्य व्यक्तीच्या नजरेतून बघतो. मागील काही महिन्यांपासून हुकुमशहाचा कल बघितल्यास आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील.

ब्लॉग – लेख – उत्तर कोरिया – मीमांसा Read More »

← Previous 1 2 3 4 Next →

Photography Award 2025

FotoVision Exhibition
CTM 5th International Exhibition

'थोडं मनातलं… थोडं जनातलं…' पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे!!!

Search on Site

Categories

Archives

Subscribe to Blog via Email

Enter your email address to subscribe and receive notifications.

Site Statistic

Site Total Page View : 11025 

Statistic

Top Posts & Pages

  • कविता
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • WordPress

Recent Posts

  • फोटोग्राफी : परिसरातील पक्षी – भाग १० February 22, 2026
  • फोटोग्राफी – नेहरू प्राणी उद्यान, हैदराबाद January 6, 2026
  • ब्लॉग : चित्रपट परिक्षण – कांतारा: अ लिजेंड चॅप्टर १ October 18, 2025
  • फोटोग्राफी – गणेशोत्सव २०२५ September 6, 2025
  • महादेवा… August 18, 2025

RSS RSS

  • फोटोग्राफी : परिसरातील पक्षी – भाग १०
  • फोटोग्राफी – नेहरू प्राणी उद्यान, हैदराबाद
  • ब्लॉग : चित्रपट परिक्षण – कांतारा: अ लिजेंड चॅप्टर १
  • फोटोग्राफी – गणेशोत्सव २०२५
  • महादेवा…
  • कविता – नमवणार
  • गझल – थांबले नाही कुणी…
  1. Mahesh Purandare on ब्लॉग : चित्रपट परिक्षण – छावा – असीम शौर्य, अचाट पराक्रम आणि त्यागाची गाथा – स्पॉइलर अलर्टFebruary 27, 2025
  2. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी : फुलपाखरू – भाग २July 1, 2023
  3. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी : फुलपाखरूJuly 1, 2023
  4. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी – TATR – ताडोबा – बटरफ्लाय वर्ल्डJune 30, 2023
  5. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी : फुलपाखरूJune 30, 2023
  6. अद्वितीय अनुभव... - निवडक चारोळी – भाग ७ on निवडक चित्र चारोळी – भाग ६June 25, 2023
  7. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : भिगवण आणि मयूरेश्वर अभयारण्य on फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग ८February 19, 2023
March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Blogadda

Discover latest Indian Blogs

IndiBlogHub

Top bloggers in india

Archives

Copyright © 2026 अद्वितीय अनुभव... भागवत बलशेटवार

Follow Us

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • Yourquote
 

Loading Comments...