चित्रपट परीक्षण

चित्रपट परीक्षण

ब्लॉग – परिक्षण – Scam 1992: The Harshad Mehta Story

अलीकडच्या काळात वेब सिरिज म्हणजे अतिरंजित कथा, अति भडक मारामारी, आणि अति भडक दृश्ये असे समीकरण बनले होते. पण या सगळ्यांना छेद देणारी नवीन वेब सिरिज म्हणजे SCAM 1992 आली आहे. IMdB या संकेतस्थळा वर ९.५ मानांकन असलेली एकमेव भारतीय वेब सिरिज आहे. त्यामुळे ही सिरिज बघायचीच असे ठरवले.

“हंसल मेहता” यांनी अगोदर दर्जेदार चित्रपट बनवले आहेत. Scam १९९२ ही जबरदस्त कथा, प्रभावी पटकथा, आणि उच्च उत्पादन दर्जा, आणि कलाकाराची अतिशय योग्य निवड आणि पार्श्वसंगीताचा अत्यंत हुशारीने वापर, कथेवर घेतलेले परिश्रम, दमदार पटकथा, दिग्दर्शकाची कथेवरील पकड या सगळ्यामुळे हंसल मेहता भाव खाऊन जातात. त्यांनी हर्षद मेहता या पात्रा साठी प्रतीक गांधी नावाचा हिरा शोधून काढला आहे.

ब्लॉग – परिक्षण – Scam 1992: The Harshad Mehta Story Read More »

ब्लॉग : चित्रपट परिक्षण – छलांग – खेळाचा त्रिकोणी तडका

ब्लॉग : चित्रपट परिक्षण – छलांग – खेळाचा त्रिकोणी तडका
खेळावर आधारित चित्रपटात रोमांच पूर्ण, खेळातील चढ उतार, भावनिकदृष्ट्या पणाला लागलेली शक्ती आणि युक्ती, दोन खेळाडू मधील संघर्ष आणि खेळ प्रशिक्षण यावर असल्याने चित्रपट आपल्याला अतिशय भावतात आणि कथा जवळची वाटते.

ब्लॉग : चित्रपट परिक्षण – छलांग – खेळाचा त्रिकोणी तडका Read More »

ब्लॉग : चित्रपट परीक्षण – लुटकेस

ब्लॉग : चित्रपट परीक्षण – लुटकेस समजा एखाद्या सामान्य माणसाला घरी जात असताना रात्री अडीच वाजता पैशाने खचाखच भरलेली सूटकेस सापडली तर तुमची अवस्था काय आहे तशीच अवस्था नंदनची झाली झाली आहे. मध्यमवर्गी लोकांचे जीवन चक्र असते आणि त्या जीवन चक्रामध्ये तो सतत फिरत असतो. ऑफिस, घर, परत ऑफिस आणि मित्र मंडळ यांच्यात मध्यमवर्गीय लोकांचं

ब्लॉग : चित्रपट परीक्षण – लुटकेस Read More »

चित्रपट परीक्षण/रिव्यू : ‘Tanhaji: The Unsung Warrior’

श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य उभे केले ते चतुराई, कर्तबगारी, खंबीर नेतृत्व, विचाराची कल्पकता, लढाऊपणा, गनिमी कावा, पराकोटीचा पराक्रम, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाख मोलाची  स्वराज्या साठी घाम गाळणारी, पराक्रम आणि बलिदान देणारी माणसं त्यांनी जमा केली. त्यापैकी एक होते “नरवीर तानाजी मालुसरे”. हे नाव उच्चारताच फक्त एक नाव आठवते ते म्हणजे सिंहगड. त्यासोबत महाराजांचे प्रसिद्ध विधान आठवते “गड आला पण सिंह

चित्रपट परीक्षण/रिव्यू : ‘Tanhaji: The Unsung Warrior’ Read More »

चित्रपट परीक्षण/रिव्यू : फत्तेशिकस्त : दमदार सर्जिकल स्ट्राइक

“शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥ शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१६॥ शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥ शिवरायचे सलगी देणें । कैसे असें ॥“ शिवराया बद्दल कितीही पुस्तके लिहिली आणि कथा चित्रपटात दाखवल्या तर कमीच पडेल. राजांची प्रत्येक लढाई, पराक्रम, कर्तृत्व, माणसं जिंकण्याची कला, आणि बुद्धीबळातील अजोड चाली प्रमाणे खिंडीत गाठून शत्रूवर केलेली मात यावर चित्रपट निघू शकतो. राजांचे उत्तुंग कर्तृत्व आणि पराक्रम आभाळाच्या परीघा सारखा होता.

चित्रपट परीक्षण/रिव्यू : फत्तेशिकस्त : दमदार सर्जिकल स्ट्राइक Read More »

चित्रपट परीक्षण/रिव्यू : “सुपर ३०” : एक हुकलेला षटकार – स्पॉईलर अलर्ट

चित्रपट परीक्षण/रिव्यू – “सुपर ३०” – एक हुकलेला षटकार हा चित्रपट बघताना मला ३ इडियट, चक दे इंडिया आणि इंग्लीश चित्रपट “मिॅरकल” या प्रेरणादायी चित्रपटाची आठवण होते. “मिॅरकल” हा अमेरिकन आईस हॉकी वर आधारित एक सुंदर चित्रपट आहे. एकंदर कथा चांगली आहे. “सुपर ३०” चित्रपटाची कथा सरळ साधी आणि सोपी आहे “शिक्षण सम्राट आणि जाती व्यवस्था विरुद्ध

चित्रपट परीक्षण/रिव्यू : “सुपर ३०” : एक हुकलेला षटकार – स्पॉईलर अलर्ट Read More »

केसरी – चित्रपट परीक्षण/रिव्यू – स्पॉईलर अलर्ट

“युद्धस्य कथा रम्या” असे म्हटले जाते. कारण युद्धात देशभक्ती, पराक्रम, त्याग, राजकारण, प्रखर संवाद, आरपारची लढाई, होत्याम्य, आणि बलिदान यांची भरपूर रेलचेल असते. बऱ्याच वेळेस आपल्याला कथा आपल्याला माहीत असते पण आपण चित्रपट बघतो कारण खरे कौशल कथेची मांडणी करण्यात असते आणि प्रेक्षक त्याकडे विशेष लक्ष देतात. केसरी हा चित्रपट ऐतिहासिक अश्या “सारगढीची लढाई” वर आधारित आहे. ही लढाई १२ सप्टेंबर १८९७ या दिवशी ब्रिटिश साम्राज्याच्या 36व्या शीख रेजिमेंटच्या २१ जवान आणि १०००० अफगाणी पठाण यांच्यात झाली होती. जगातील आता पर्यंतच्या पहिल्या पाच सर्वोच्च लढाईत या लढाईची गणना होते. त्यांच्या पराक्रम ऐकूनच आपण रोमांचित होतो. ते क्षण जर आपल्या डोळ्यासमोर साकारले तर काय होईल?

केसरी – चित्रपट परीक्षण/रिव्यू – स्पॉईलर अलर्ट Read More »

ब्लॉग – चित्रपट परीक्षण – नाळ

मी नाळ या चित्रपटाचा ट्रेलर बघितला आणि “जाऊ दे न व” हे गाणं पाहीलं आणि हा चित्रपट आपण बघायचाच असे ठरवले. हा चित्रपट “सुधाकर रेड्डी येक्कांटी” यांनी दिग्दर्शित केला आहे. “सुधाकर” हा प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर, लेखक आहे. नागराज मंजुळे आणि सुधारक यांचे चित्रपटाचे संवाद कागदावर नाही तर प्रेक्षकांच्या हृदयात कोरले जातात. चित्रपटाला दमदार पार्श्वसंगीत “अद्वैत निमलेकर” यांनी दिले आहे. अ.व. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे. चित्रपटात एकच गाणे आहे पण तेच गाणे चित्रपटाचे कथा सार ३.४४ मिनिटात दाखवते. प्रमुख भूमिका “नागराज मंजुळे”, “देविका दफ्तरदार” आणि “श्रीनिवास पोकळे” यांची आहे.

ब्लॉग – चित्रपट परीक्षण – नाळ Read More »

चित्रपट परिक्षण – tc.gn – टेक केअर गुड नाईट – साइबर गुन्हा आणि वास्तव

चित्रपटाची सुरुवात एका व्याखाना पासून सुरू होते. सचिन खेडकर हा व्याखान निमंत्रित म्हणून त्यांच्या एक मित्राची गोष्ट प्रेक्षकांना सांगतो. खरे तर ती कथा त्याची स्वत:चीच असते. हीच चित्रपटाची कथा आहे. या कथेचा नायक अविनाश पाठक (सचिन खेडेकर) आहे. हा एका चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्यावर असतो. पण नवीन तंत्रज्ञाना सोबत त्याला जुळवून घेता येत नाही म्हणून तो सेवानिवृत्ती घेण्याच्या विचारात असतो. आसावरी(इरावती हर्षे) त्याची पत्नी एक शैक्षणिक सल्लागार आहे. पण तिला नवीन पिढी सोबत जुळवून घ्यायला अवघड जात आहे. त्यांचा मुलगा अमेरिकेत शिक्षणासाठी गेला आहे. त्यांची मुलगी सानिका (पर्ण पेठे) बारावीला कमी गुण मिळाल्यामुळे कॉमर्सला असते. अविनाश घरच्यांचा विरोध पत्करून निवृत्ति घेतो. ऐच्छिक निवृत्तिसाठी त्याला ५० लाख मिळतात.

चित्रपट परिक्षण – tc.gn – टेक केअर गुड नाईट – साइबर गुन्हा आणि वास्तव Read More »

पश्चिमरंग – चित्रपट – द डार्क नाईट(The Dark Knight)

२००८ ला एका संध्याकाळी माझा मित्र रूमवर आला आणि एका चित्रपटा बद्दल बोलताना सांगीतले की जोकरने पूर्ण चित्रपट खाल्ला आहे. त्या वेळेस मी चित्रपट बघितला नव्हता. “हा जोकर कोण” हा विचार मा‍झ्या मनात आला होता? ज्या वेळेस जोकर साकारणार्‍या कलाकाराला (हिथ लेजर/Heath Ledger) ऑस्कर मिळाला तेव्हा मी हा चित्रपट बघितला. मला खूपच आवडला. मी १५-२० वेळेस या चित्रपटाचे पारायण केली असतील. त्या पैकी १० वेळेस मी फक्त मध्यंतरा पर्यंतच पाहीलेत. हा चित्रपट मा‍झ्या यादीत पहिल्या पाच चित्रपटात आहे. बॅटमॅन चित्रपट मालिकेतला दुसरा भाग आहे. तरी पण पहिला न बघता दुसरा चित्रपट बघितला तरी विशेष अशी उणीव जाणवत नाही आणि पहिला भाग बघितल्यास उत्तमच. आणि क्रिस्टोफर नोलन (Christopher Nolan) या अ‍वलियाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नोलन यांचे चित्रपट अफाट प्रसिद्ध आहेत. या चित्रपटाला IMDb या साईट वर पहिल्या पाच चित्रपटात तिसरे मानांकन असून समीक्षा मूल्यांकन ९.० आहे.

पश्चिमरंग – चित्रपट – द डार्क नाईट(The Dark Knight) Read More »