वधू – वर परिचय मेळावा

मध्यस्थीची स्थळ जमवण्यासाठी लगबग – लगबग
मुलींच्या वडीलांची मुलीसाठी तगमग – तगमग
पाहूण्याची स्थळ शोधण्यासाठी दगदग – दगदग
निमंत्रित करतात उदघाटनाने झगमग – झगमग
मुलांना परिचय देतांना वाटते धगधग – धगधग

मुलींची सुंदर दिसण्याचीे असते झटपट – झटपट
लहानाची स्नँकसाठीे आईकडे कटकट – कटकट
ऐका मागून एक स्थळ बघतात पटपट – पटपट
मुलींना प्रश्न विचारताच कापतात लटलट – लटलट
रिफ्रेश होण्यासाठी चहा पितात घटघट – घटघट

वधू – वर परिचय मेळावा Read More »

प्रवास – समृध्द अनुभव देणारा

अनोळखी व्यक्ती सोबत समृध्द अनुभव देणारा
कधी ओळखीचा, कधी अवघड, न बोलणारा

अंतर्मुख करणारा, अव्यक्त, कधीही न संपणारा
स्वतःच स्वतः ची ओळख घडवणारा

कधी उदास, प्रसन्न, रिफ्रेश करणारा
मौज मस्ती, बेधुंद, स्वप्न फुलवणारा

प्रवास – समृध्द अनुभव देणारा Read More »

नवीन वर्ष सुखात जावो

नवीन वर्षाचे स्वागत करायला शब्द सुचेना
मागील वर्षाचा आढावा घ्यायला वेळ पुरेना

वर्ष सरले, रंगवून विविध छटा सूर्य मावळला
गर्द अंधाराला झुगारून आशेचा किरण उगवला

मागील वर्षी लावलेल्या रोपाचे आता वृक्ष बनेल
मागील वर्षीच्या संकल्पांची आता पूर्तता होईल

नवीन वर्ष सुखात जावो Read More »

आई म्हणजे वात्सल्याची मूर्ती

आई म्हणजे. . . . . . .
लेकरां साठी असते वात्सल्याची मूर्ती
मुला करता सत्यात उतरणारी कृती
लेकरां साठी भावनांची इच्छा पूर्ति
कुटुंबा साठी सतत धगधगणारी क्रांती

आई म्हणजे. . . . .. .
मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी युक्ती
सगळ्यांना घराची ओढ लावणारी व्यक्ति
कितीही संकटे आल्यास लढणारी शक्ति
आईची सेवा केल्यास मिळेल मोक्ष्याची प्राप्ती

आई म्हणजे वात्सल्याची मूर्ती Read More »

अमरनाथ यात्रा – अद्वितीय अनुभव

वर्षे २०११ पासून घरी चर्चा चालू होती की सगळे मिळून वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रा करुया. पण मुहूर्त लागत नव्हता. मार्च २०१४ मध्ये अमरनाथ यात्रे बद्दल आणि टूर ऑपरेटर ची सर्व माहिती काढली आणि प्रवासाचे नक्की केले. टूर ऑपरेटर ने सांगितले की मेडीकल चेकअप करून अमरनाथ रजिस्ट्रेशन फाॅर्म भरून आणा. मी माझ्या फॅमिली ची सगळी माहिती भरून फाॅर्म दिले. पहलगाम मार्गे जाण्याचे नक्की झाले.
यात्रेला २ मार्ग आहेत. १. बालताल – १४ किलोमीटर, २.पहलगाम – ३२ किलोमीटर.
पहलगाम/बालताल मार्गे अमरनाथ जाणाया साठी ४ पर्याय उपलब्ध आहेत.
१.चालत, २.घोडा, ३.हेलिकॉप्टर, ४.पालखी.

हेलिकॉप्टर बुकींग १ माॅर्चला सुरु झाले आणि २ दिवसात बुकिंग फुल झाले. मग मित्रांनी सागितले की हेलिकॉप्टर बुकिंग पहलगामला पोहोचल्या नंतर सुद्धा करता येते. आम्ही २९ जूनला श्रीनगरला पोहाचलो. अमरनाथ बोर्डाने पहलगाम मार्ग बर्फ साचल्यामुळे २ जुलै पर्यंत बंद केला होता. विचारपूस केल्यानंतर कळले की हेलिकॉप्टर बुकिंग फुल आहे आणि ब्लँक मध्ये ४५०० चा पास ८५०० ला भेटतो. बालताल

अमरनाथ यात्रा – अद्वितीय अनुभव Read More »

Translate »