ब्लॉग : ‘वेब सिरिज’ परिक्षण – ‘फॅमिली मॅन’ – ‘सीजन 2’ – जबरदस्त अ‍ॅक्शन थ्रिलर

चित्रपट परीक्षण

परत एकदा “श्रीकांत तिवारी” फॅमिली मॅन – सीजन 2 घेऊन येत आहे. “श्रीकांत” काही अफाट, अचाट, महाशक्ती असलेला सुपरमॅन किंवा स्पायडर मॅन नाही. त्याच्यावर देशाची आणि कुटुंबाची जबाबदारी आहे. या वेळेस तर देश आणि कुटुंबा वर धोका वाढला आहे. “श्रीकांत” एक प्रेमळ पिता, धूर्त, हुशार, T.A.S.C (टास्क – Threat Analysis and Surveillance Cell) मधील वरिष्ठ अधिकारी, चांगला मित्र आणि संवेदनशील मनुष्य आहे आणि चांगला पती होण्याची सतत धडपड चालली असते. पहिल्या सीजन मधील काही चुका मुळे तो टास्क सोडतो आणि एक आयटी कंपनीत कामाला लागतो. त्यामुळे कुटुंबा सोबत चांगला वेळ व्यतीत करतो. पण त्यामुळे पत्नी सोबत संबंध काही सुधारत नाहीत. आणि इकडे त्याचा मॅनेजर त्याला “don’t be minimum guy” म्हणून हेटाळत असतो. दोघांचे संवाद विनोदी आहेत. “श्रीकांत” मनातले सुख आणि दुख व्यक्त फक्त “JK” समोर फक्त करत असतो. आयटी मध्ये जरी काम करत असला तरी त्याचे मात्र मन टास्क मध्येच असते. सिरीज मधील त्याच्या प्रत्येक फ्रेम मध्ये मनोज जीव ओततो. कोणत्याही फ्रेम मध्ये तो मनोज न वाटता “श्रीकांत”च वाटतो. हताश, धूर्त, हुशार, संवेदनशील, विनोदी, देशभक्त, आणि प्रेमळ व्यक्तिरेखा त्याने जबरदस्त ताकदीने उभारली आहे. यात काही वादच नाही.

ब्लॉग : ‘वेब सिरिज’ परिक्षण – ‘फॅमिली मॅन’ – ‘सीजन 2’ – जबरदस्त अ‍ॅक्शन थ्रिलर Read More »

ब्लॉग : चित्रपट परिक्षण – ’96 – तरल भावनेचा उत्कृष्ट आविष्कार

चित्रपट परीक्षण

चित्रपट परिक्षण – ‘96 – तरल भावनेचा उत्कृष्ट आविष्कार

मी मागच्याच वर्षी मूळ तमिळ भाषेतील “’96” हिंदीत डब केलेला चित्रपट यूट्यूब वर बघितला होता. चित्रपट अप्रतिम असल्याने परिक्षण लिहायची माझी हिम्मत झाली नाही. सहजच मित्रा सोबत साऊथ च्या चित्रपटा बद्दल चर्चा करत असताना “’96” चा विषय निघाला. मित्रा ने मला सांगीतले की या चित्रपटा बद्दल तू नक्कीच लिहायला पाहिजे. त्याने या चित्रपटा बद्दल लिहायला प्रोत्साहीत केल्या मुळे हा लेख प्रपंच करतो आहे.
एखाद्या चित्रपटात अतिरंजित मार धाड, आयटम नंबर्स, शिव्या शाप, वंशवाद, भडक पेहराव, पांचट विनोद, अति गंभीर अभिनय, भावना प्रधान अत्याचार, उगाच रडारड, असे काहीही नसल्यास तुम्ही चित्रपट बघाल का? जर उत्तर हो असेल तर वरील पैकी काहीही नसलेला आणि उच्च प्रतिचा अभिनय त्या सोबत अतिशय हळुवार नी तरल उलगडत जाणारी, आणि अंतर्मनाला भावणारी, विचाराला उद्युक्त करणारी प्रेम कथा तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल.

ब्लॉग : चित्रपट परिक्षण – ’96 – तरल भावनेचा उत्कृष्ट आविष्कार Read More »

कविता: परत पुन्हा

कविता

घेऊन काळजाचा ठाव केला मित्रानेच तीव्र वार पुन्हा
फंदी फितुरीचे पसरलं जाळं त्यात अडकाल परत पुन्हा
 
जीवनाच्या निळ्याशार आकाशात विजा कडाडल्या पुन्हा
हे ही दिवस जातील चांगले दिवस येतील परत पुन्हा

कविता: परत पुन्हा Read More »

ब्लॉग : चित्रपट परीक्षण : Drishyam 2 – The Resumption : – जबरदस्त, उत्कंठावर्धक सिक्वेल

चित्रपट परीक्षण
Drishyam 2 Poster

तुम्ही लहानपणी विक्रम वेताळची गोष्ट नक्कीच वाचली असेल. विक्रम प्रत्येक वेळेस वेताळाला पकडतो आणि वेताळ त्याला प्रत्येक वेळेस एक गोष्ट सांगतो. गोष्ट संपल्या नंतर वेताळ प्रश्न विचारतो. राजा विक्रमादित्य ने जर उत्तर दिले नाही तर त्याच्या डोक्याचे हजार तुकडे होतील असे सांगतो. राजा विक्रमादित्यने उत्तर दिल्या नंतर मात्र वेताळ उडून जातो. अशीच कथा चित्रपटात रूपांतरित झाली तर काय होईल. कोणत्याही संदर्भ, घटना, गोष्टीला दोन पैलू असतात. दोन्ही पैलू पडताळून पहिल्या नंतरच खर उत्तर मिळते. कारण सत्य आणि असत्य मध्ये सुद्धा थोडसच अंतर असते.

ब्लॉग : चित्रपट परीक्षण : Drishyam 2 – The Resumption : – जबरदस्त, उत्कंठावर्धक सिक्वेल Read More »

पक्षी फोटोग्राफी :  लॉकडाऊन – भाग ५

फोटोग्राफी
मराठी नाव: वेडा राघू. English: Green Bee-eater (Old– Small or Little Bee-eater). Scientific Name :Merops orientalis.

पक्षी फोटोग्राफी :  लॉकडाऊन – भाग ४
Bird Photography in Lockdown Part 4

पक्षी फोटोग्राफी :  लॉकडाऊन – भाग ५ Read More »

ब्लॉग – कविता: मित्रांची मैफल

कविता
Friendship

जमवू मित्रांची मस्त मैफल
काढू प्रत्येकांची पिसे अस्सल
लावू मस्त गप्पा-टप्पाचा फड
कधी-कधी आठवणीं होतील जड

घेऊ महत्त्वाच्या विषयावर सल्ला
एकमेका करून मदत गाठू पल्ला
करू विचाराचे मंथन मांडू मत
पुढील भेटीसाठी देवू विचारांना खत

सोडू कधी सुख दु:खाची शिदोरी
येतील ते स्वर्गीय क्षण पुन्हा माघारी
घेऊ थोडा आयुष्यातून छोटासा ब्रेक
लुटू आनंद हीच जीवनाची खरी मेख

ब्लॉग – कविता: मित्रांची मैफल Read More »

फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग ४

फोटोग्राफी

भाग १ – फोटोग्राफी : लॉकडाऊन मध्ये केलेली भाग २ – फोटोग्राफी : लॉकडाऊन – भाग २ भाग ३ – फोटोग्राफी : लॉकडाऊन – भाग ३ फोटोग्राफी : परिसरातील पक्षी  फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग  २  फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग ३     Views: 213

फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग ४ Read More »