ब्लॉग : लेख : चित्रपट पार्श्वसंगीत (Back Ground Music)
समजा तुम्ही चित्रपट बघत आहात आणि एक सस्पेन्स युक्त धीरगंभीर असा संवाद चालू आहे. पण संवाद चालू असताना पार्श्वसंगीतच नसेल तर तुम्हाला जेवणात मीठच नाही असा अनुभव येईल. ते संवाद तुम्हाला कदाचित भारदस्त वाटणार नाहीत किंवा त्यातील पूर्ण मज्जाच जाईल. जर चित्रपट भोजनाची परिपूर्ण थाली असेल तर मुख्य पदार्थ कथा, भात संगीत आणि पार्श्वसंगीत मिठाचे काम करेल. त्यामुळे पार्श्वसंगीता शिवाय चित्रपटाला गोडीच नाही.
पार्श्वसंगीत मानवीय भाव भावनांचा अचूक वेध घेते. समजा बाहुबलीची लढाई चालू आहे आणि त्यात पार्श्वसंगीत नसेल तर विचार करा बाहुबली चित्रपटाला एवढी प्रसिद्धी भेटली असती का? नक्कीच तुमचे उत्तर नाही असेच येईल. कारण या चित्रपटातील प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगात अगदी योग्य आणि प्रभावी पार्श्वसंगीताचा वापर केला आहे. बाहुबलीचा विषय असेल तर मी या चित्रपटाचे पार्श्वसंगीत आज ही ऐकतो. “WKKB” हे बॅकग्राऊंड स्कोर तर माझ्या अतिशय आवडीचे आहे. बाहुबली दोन्ही चित्रपट सर्व अर्थाने परिपूर्ण आणि भारतीय चित्रपट सृष्टि साठी मैलाचा दगड आहेत. “म. म. कीरवाणी” यांनी दोन्ही चित्रपटाचे मिळून पार्श्वसंगीताचे 10 OST Volume काढले आहेत. आणि चित्रपटात अतिशय चोख वापरले आहेत.
ब्लॉग : लेख : चित्रपट पार्श्वसंगीत (Back Ground Music) Read More »