“कार” पुराण – भाग २
कार वितरण स्वीकारण्यासाठी मी एक तारखेला १.३० वाजता निघालो. पु.ल. यांनी म्हंटल्या प्रमाणे तिकिटाचे आरक्षण केले तरी आम्ही गार्डाच्या डब्बात जाणार त्या प्रमाणे मी किती ही वेळेचे नियोजन केले तरी मला किमान एक तास तरी उशीर होणार. अश्या वेळी मित्राचा किंवा नातेवाईकाचा पूर्वानुभव कामास येतो. माझा नातेवाईक माझ्या अगोदर ठरवलेल्या वेळेत पोहोचला होता. त्याने त्याच्या पारखी नजरे खालून गाडीची पाहणी केली त्याचे रंगा बद्दल निरीक्षण बरोबर निघाले. गाडीच्या रंगावर धूळ आणि वाहतुकी मध्ये कागद लागून गाडीचा रंग काही ठिकाणी खडबड वाटत होता. मग गुणवत्ता व्यवस्थापिके सोबत बोलणे झाले. त्यांनी (लेप) कोअटींग करून देतो असे सांगीतले. तो पर्यंत मी बाकीचे राहलेले पैसे भरले आणि दस्तऐवज घेतले. त्यांनी कारच्या रंगावर वर प्रक्रिया करून एक तासात कार परत आणली. तरी मुळ समस्या तशीच होती. मला वस्तु निर्मिती व्यंग आहे यांची शंका यायला लागली. पण तसे काही नव्हते. शेवटी दोन प्रयत्ना नंतर काम झाले आणि कार घरी जाण्यासाठी सज्ज झाली. मग काय आई वडीलांनी पूजा केली आणि प्रात्यक्षिक नंतर आम्ही घरी जाण्यास सज्ज झालो.
“कार” पुराण – भाग २ Read More »