संगमेश्वर(झारा संगम) आणि नृसिंह मंदिर (बीदर)
मी सकाळी ५.३० वाजता झहिराबादला पोहोचलो. तिथे बस स्टॅन्ड वर २ माणसे मराठीत बोलत होती. तेलुगू परिसरात पहाटे-पहाटे अलभ्य लाभ. चौकशी केल्या नंतर ती मंडळी आमच्या भागातीलच होती. तेथून ते दोघे संगमेश्वर मंदिराला जाणार होतो.
संगमेश्वर येथे पुरातन महादेव मंदिर आहे. हे मंदिर बऱ्याच कुटुंबासाठी कुलदैवत असल्या मुळे येथे भाविकाची वर्दळ असते. मंदिरात गरूड स्तंभ आहे. तिथे भाविक पाण्याच्या कुंडाची पुजा करतात. दिवसातून पहिल्यांदा कुंड पूर्ण उपसतात. कुंडाच्या एका कोपर्याच्या देवळीतून पाण्याचा स्रोत येतो. कुंडातील पूर्ण पाणी उपसतात. एका विशिष्ट देवळीत नेवैद्य ठेवतात जेथे महादेवाची छोटी पिंड आहे. नेवेद्य पाण्याच्या विरुद्ध दिशेला सोडून सुद्धा आतल्या बाजूस ओढला जातो.
संगमेश्वर(झारा संगम) आणि नृसिंह मंदिर (बीदर) Read More »