चित्र चारोळी
चित्रचारोळी – बासुरीचे सूर चित्रचारोळी – पक्षी चित्रचारोळी – अस्तित्व Views: 220
विनाकारण उगाच झुंजतात माणसं
इतरांवर विश्वास ठेवून गंजतात माणसं
नात्यातला गुंता वाढवतात माणसं
वेड पांघरूण व्यर्थजगतात माणसं
सरड्या प्रमाणे रंग बदलतात इथे
पश्चातापा मुळे आत जळतात इथे
समई प्रमाणे सतत तेवत राहतात इथे
जीवाला-जीव लावणारे असतात इथे
कविता : कुटुंब आणि वाद Read More »
सुंदर, अद्भुत, अकल्पनीय असा चित्रपट बनवला आहे राजमौली या दिग्दर्शकाने. चित्रपटाची प्रत्येक फ्रेमवर मेहनत जाणवते. दिग्दर्शक प्रेक्षकांच्या मनाची घट्ट पकड घेतो. महाभारताचे प्रतिबिंब जाणवेल कथेत. महाभारताच्या कथेत तुम्हाला सगळे काही सापडते त्या प्रमाणे इथे प्रयोग, प्रेमाचा त्रिकोण, हेवेदावे, मारामारी, वचन, शिक्षा, अदभुत पराक्रम विनोद, नाट्य, रहस्य, डाव-प्रतिदाव, अतर्क, अजिंक्य, डोळे दिपावणारे विशिष्ठ परिणामकारक दृश्य आणि त्यात कथेतील वळण चित्रपटाला एका वेगळ्याच रम्य दुनियेत घेऊन जातो.
बाहूबली २ – एक निरीक्षण Read More »
सप्ताहाचा शेवटच्या दिवसाची प्रसन्न सुरुवात काकडा भजनं झाल्यानंतर “याती कुळ माझे गेले हरपुनी । श्रीरंगा वाचून अणू नेणे॥” या गवळणीने झाली.
११ वाजता काल्याचे किर्तन ह. भ. प मोहन महाराज खुर्दळीकर यांनी पुढील अभंगावर केले.
उपजोनिय पुढती येऊ । काला खाऊ दही भात!!१!!
वैकुंठी तो असे नाही । कवळ काही काल्याचे!!ध्रु!!
एकमेका देऊ मुखी । सुखी घालु हुंबरी!!२!!
तुका म्हणे वाळवंट । बरवें नीट उत्तम!!३!!
“काला म्हणजे जीव ब्रह्माचे ऐक्य. काला स्वर्गात सुद्धा भेटत नाही. आम्ही परत-परत काला खाण्यासाठी येऊ आणि पंढरपुरात वाळवंटात एकमेका सोबत काला खाऊन आनंदाने नाचू.” असा अभंगाचा अर्थ वडीलांनी सांगीतला आहे.
महादेव मंदिर यात्रा कधी पासून सुरू झाली याची कुठेही नोंद नाही. शिरूर ताजबंद येथे १९५४ या साली माधवराव गुरुजी, अहमदपूरकर यांनी यात्रेच्या काळात सप्ताह करायला सुरूवात केली. यात्रेचे वेध गुढीपाडव्या वेळेस लागतात. यात्रा सप्ताह दर वर्षी चैत्र महिन्याच्या षष्ठीला सुरू होतो. त्रयोदशीला सप्ताहाचा शेवट असतो. बहुतेक मार्च किंवा एप्रिल च्या दरम्यान वेळ असते. ५ वाड्या आणि सहावे शिरूर या गावातील मंडळी कार्य पार पाडतात. गावातील विविध
महेश मंदिर यात्रा २०१७ – शिरूर ताजबंद Read More »
पंखा खडखड आवाज करत फिरत होता. मुग्धाला दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. स्नान गृहात जाऊन आल्यावर तिला कुठे आल्हाददायक वाटलं. आणि आत्ता कुठे वाटल की पोट साफ झाले आहे. हुश्श! आत्ता परवा पासून दिनचर्याला सुरुवात करायला हरकत नव्हती. परत तेच ऑफिसच कार्य, आणि घर यात मुग्धा गुरफटणार होती.
मुग्धा ऑफिस ला रूजू झाली. तिची सगळ्या मित्र-मैत्रिणींनी तिची विचारपूस केली. मग हळू-हळू मागील राहलेले कार्य आणि येणारे नवीन काम याचा तिने मेळ घालायचा प्रयत्न केला. तिला वेळेचे आणि कामाचे व्यवस्थापन व्यवस्थित जमायचे. मुग्धाचा नवरा प्रथमेश सुद्धा एका चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्यावर होता. त्यांना दररोज एकमेकाला वेळ द्यायला जमायचे नाही. मग ती कसर दोघं आठवड्याच्या सुट्टीत भरून काढायचे. मागील कार्य संपायच्या आधीच मुग्धाला दुसर्या एका मोठ्या कार्यासाठी नियुक्ती झाली. मग काय ती परत एकदा जोमाने कामाला लागली. मुग्धाला कधी-कधी कामकाजाचा थकवा जाणवायचा.
मी सकाळी ५.३० वाजता झहिराबादला पोहोचलो. तिथे बस स्टॅन्ड वर २ माणसे मराठीत बोलत होती. तेलुगू परिसरात पहाटे-पहाटे अलभ्य लाभ. चौकशी केल्या नंतर ती मंडळी आमच्या भागातीलच होती. तेथून ते दोघे संगमेश्वर मंदिराला जाणार होतो.
संगमेश्वर येथे पुरातन महादेव मंदिर आहे. हे मंदिर बऱ्याच कुटुंबासाठी कुलदैवत असल्या मुळे येथे भाविकाची वर्दळ असते. मंदिरात गरूड स्तंभ आहे. तिथे भाविक पाण्याच्या कुंडाची पुजा करतात. दिवसातून पहिल्यांदा कुंड पूर्ण उपसतात. कुंडाच्या एका कोपर्याच्या देवळीतून पाण्याचा स्रोत येतो. कुंडातील पूर्ण पाणी उपसतात. एका विशिष्ट देवळीत नेवैद्य ठेवतात जेथे महादेवाची छोटी पिंड आहे. नेवेद्य पाण्याच्या विरुद्ध दिशेला सोडून सुद्धा आतल्या बाजूस ओढला जातो.
संगमेश्वर(झारा संगम) आणि नृसिंह मंदिर (बीदर) Read More »
एखादी ऐतिहासिक वास्तु आपल्या जवळ असून सुद्धा आपल्याला बघण्यासाठी वेळ भेटत नाही तसेच काहीसे प्रतापगड बाबतीत झाले.
एका निमित्ताने महाबळेश्वरला जाण्यात आले. आम्ही तेथून प्रतापगडला गेलो. त्यात वेळेमुळे काही मित्र नाराज झाले पण ठीक आहे होते असे कधी कधी.
मला लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात प्रतापगडाचा उल्लेख आहे हे आठवले आणि त्यात किल्ल्याच्या टेहळणी बुरूजाचा फोटो सुद्धा होता. प्रतापगड महाबळेश्वर पासून फक्त 22 किलोमीटर वर आहे. महाबळेश्वर पासून प्रतापगड जायचा रस्ता वळणा वळणाचा आहे. रस्ता घाटा घाटातून आणि डोंगरातून जातो. परंतु रस्त्यावर खुप खड्डे सुद्धा झालेत. त्यामुळे थोडी चिडचिड होते. पण मित्रामध्ये आठवणी सांगण्यात कधी वेळ गेला कळलेच नाही. संभाषणाचा वारू चौफेर उधळला होता. दोन कारमध्ये कुरघोडी करण्यातच किल्ला जवळ आला.
जगण्याच्या फाफटपसाऱ्यात विसरू नको मला
लहानपणीच्या लुटू पुटु खेळाची शपथ तुला
आठवतो का बघ आपण बांधलेला किल्ला
संवाद अखंड राहावा हे सांग स्वत:ला
जीवनाचे रहाटगाणे प्रवाही
वेळेचा मोबदला मिळेल तुला…
चल सुख दुःखाच्या गोष्टी सांगू एकमेकाला
भेटेल का वेळ दादा तुला….
भेटला का वेळ दादा तुला Read More »
दुकानातून मधून मोबाइल खरेदी करणे चांगला अनुभव असू शकतो. पण तत्सम ई-वाणिज्य साईट वर उद्घाटनच्या दिवशी खरेदी करणे हा अनुभव हा एकदम आगळा वेगळा असू शकतो. कारण तो मोबाइल आपण कधीच हाताळलेला नसतो. मोबाईल कंपन्या उद्घाटनच्या दिवशी विविध सवलत आणि सुट ठेवतात. त्या वेळेस मोबाइल खरेदी करणे म्हणजे सुनियोजित लग्न करण्या सारखे आहे. वधूवर परिचय मेळाव्या मध्ये मुला मुलीची ब्रँडिंग केली जाते तसे मोबाइल कंपन्या जाहिरातीचा भडिमार करतात. सवलत वाटतात. आपल्याला नवीन मोबाइल विकत घायचा असतो. मग जाहिराती आणि विशिष्ट व्यापारी मुद्रा असलेला बघून किंवा नवीन जुन्या मोबाइलचे गुणधर्म तपासून आपण नवीन मोबाइल खरेदी करायचे ठरवतो.
मोबाइल खरेदी – उद्घाटन दिवस सवलत Read More »
काही प्रवास अचानक ठरतात. दोन आठवड्याखाली कोकणात जाण्याचा असाच योग आला. बऱ्याच दिवसांनी मित्र भेटला. दुसऱ्या मित्राच्या नातेवाईकाची कार प्रवासासाठी सज्ज झाली. ताम्हिणी घाटातून प्रवास योजला होता. मित्र ड्राइविंग सीट वर होता. ताम्हिणी घाटातून जाताना मन खुप प्रसन्न होत होते. मोकळा रस्ता.. बाजूला हिरवागार निसर्ग… ओळीनी जाणारे सायकल स्वार… मध्येच वाहणारे लहान-मोठे धबधबे, वर्षा विहारासाठी निघालेली कुटुंब… मित्र मैत्रिणी… वाटेत कोणी निसर्गाचा आस्वाद घेतोय… कोणी चहाचा… कोणी जेवणाचा… गप्पांचा आस्वाद… धबधब्या मध्ये एकमेक वर पाणी उडवून मैत्रीचा आस्वाद..
मला वाटते की माणूस जसा-जसा निसर्ग जवळ जातो तसा तणाव मुक्त होतो. कार मध्ये आमच्या गप्पा मस्त पैकी रंगल्या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक पासून ते आयुर्वेद पर्यंत सगळ्या गोष्टीचा उहापोह झाला. हिलरी किती चांगल्या आहेत आणि ट्रम्प किती बेकार आहे ते आयुर्वेद, योगा आणि लंडन मधल्या आरोग्य सुविधा पर्यंत चर्चा झाली. आमचं काय विषय कोणता ही असो आपला मुद्दा सांगायचा. जसे कोकणात शिरत होतो तसे-तसे निसर्ग आपली विविध रूपे दाखवत होता.
कोंकण – हर्णे आणि केशवराज मंदिर Read More »