कविता: बेलाची लाखोळ

वृत्त वनहरिणी (८+८+८+८=३२)

इच्छा होती बेलाची लाखोळ वहावी मना सारखी
करू आरती निळकंठाची नजर असू दे जरा पारखी
प्रवास नव्हता मुळीच सोपा कष्ट खूप अन खूप अडथळे
लाखोळीचे नियम कडक अन किती सोवळे वेगवेगळे
 
धार्मिकतेचे वलय श्रावणी सश्रध्द स्वागत करीत असते
पाण्याचा अभिषेक चालतो काकड्यास गर्दी ही असते
बेल वाहण्यासाठी असतो काळ चांगला पहाट वेळी
मुहूर्त गाठायास करावी धावपळीची रोजच खेळी

कविता: बेलाची लाखोळ Read More »

कविता: आठवणींच्या डोहामध्ये

घेऊन काळजाचा ठाव केला मित्रानेच तीव्र वार पुन्हा
फंदी फितुरीचे पसरलं जाळं त्यात अडकाल परत पुन्हा
 
जीवनाच्या निळ्याशार आकाशात विजा कडाडल्या पुन्हा
हे ही दिवस जातील चांगले दिवस येतील परत पुन्हा

कविता: आठवणींच्या डोहामध्ये Read More »

कविता: आला पाऊस भरून

घेऊन काळजाचा ठाव केला मित्रानेच तीव्र वार पुन्हा
फंदी फितुरीचे पसरलं जाळं त्यात अडकाल परत पुन्हा
 
जीवनाच्या निळ्याशार आकाशात विजा कडाडल्या पुन्हा
हे ही दिवस जातील चांगले दिवस येतील परत पुन्हा

कविता: आला पाऊस भरून Read More »

गझल: काळजाला ठेच

वृत : देवप्रिया
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा
2122 2122 2122 212 = एकूण मात्रा: 26

*काळजाला ठेच*
काळजाला ठेच ही, आता भरावी वाटते
मी पणाला विश्रांती, कीर्ती उरावी वाटते

दुसर्‍याचा आदर्श डोळ्या समोरी का ठेवू
स्व विचारांची वाट आता धरावी वाटते

आसक्त दीर्घ सुखाची वाट कुठे संपली
मानवाला दु:खाची रात्र सरावी वाटते

गझल: काळजाला ठेच Read More »

ब्लॉग : ‘वेब सिरिज’ परिक्षण – ‘फॅमिली मॅन’ – ‘सीजन 2’ – जबरदस्त अ‍ॅक्शन थ्रिलर

परत एकदा “श्रीकांत तिवारी” फॅमिली मॅन – सीजन 2 घेऊन येत आहे. “श्रीकांत” काही अफाट, अचाट, महाशक्ती असलेला सुपरमॅन किंवा स्पायडर मॅन नाही. त्याच्यावर देशाची आणि कुटुंबाची जबाबदारी आहे. या वेळेस तर देश आणि कुटुंबा वर धोका वाढला आहे. “श्रीकांत” एक प्रेमळ पिता, धूर्त, हुशार, T.A.S.C (टास्क – Threat Analysis and Surveillance Cell) मधील वरिष्ठ अधिकारी, चांगला मित्र आणि संवेदनशील मनुष्य आहे आणि चांगला पती होण्याची सतत धडपड चालली असते. पहिल्या सीजन मधील काही चुका मुळे तो टास्क सोडतो आणि एक आयटी कंपनीत कामाला लागतो. त्यामुळे कुटुंबा सोबत चांगला वेळ व्यतीत करतो. पण त्यामुळे पत्नी सोबत संबंध काही सुधारत नाहीत. आणि इकडे त्याचा मॅनेजर त्याला “don’t be minimum guy” म्हणून हेटाळत असतो. दोघांचे संवाद विनोदी आहेत. “श्रीकांत” मनातले सुख आणि दुख व्यक्त फक्त “JK” समोर फक्त करत असतो. आयटी मध्ये जरी काम करत असला तरी त्याचे मात्र मन टास्क मध्येच असते. सिरीज मधील त्याच्या प्रत्येक फ्रेम मध्ये मनोज जीव ओततो. कोणत्याही फ्रेम मध्ये तो मनोज न वाटता “श्रीकांत”च वाटतो. हताश, धूर्त, हुशार, संवेदनशील, विनोदी, देशभक्त, आणि प्रेमळ व्यक्तिरेखा त्याने जबरदस्त ताकदीने उभारली आहे. यात काही वादच नाही.

ब्लॉग : ‘वेब सिरिज’ परिक्षण – ‘फॅमिली मॅन’ – ‘सीजन 2’ – जबरदस्त अ‍ॅक्शन थ्रिलर Read More »

ब्लॉग : चित्रपट परिक्षण – ’96 – तरल भावनेचा उत्कृष्ट आविष्कार

चित्रपट परिक्षण – ‘96 – तरल भावनेचा उत्कृष्ट आविष्कार

मी मागच्याच वर्षी मूळ तमिळ भाषेतील “’96” हिंदीत डब केलेला चित्रपट यूट्यूब वर बघितला होता. चित्रपट अप्रतिम असल्याने परिक्षण लिहायची माझी हिम्मत झाली नाही. सहजच मित्रा सोबत साऊथ च्या चित्रपटा बद्दल चर्चा करत असताना “’96” चा विषय निघाला. मित्रा ने मला सांगीतले की या चित्रपटा बद्दल तू नक्कीच लिहायला पाहिजे. त्याने या चित्रपटा बद्दल लिहायला प्रोत्साहीत केल्या मुळे हा लेख प्रपंच करतो आहे.
एखाद्या चित्रपटात अतिरंजित मार धाड, आयटम नंबर्स, शिव्या शाप, वंशवाद, भडक पेहराव, पांचट विनोद, अति गंभीर अभिनय, भावना प्रधान अत्याचार, उगाच रडारड, असे काहीही नसल्यास तुम्ही चित्रपट बघाल का? जर उत्तर हो असेल तर वरील पैकी काहीही नसलेला आणि उच्च प्रतिचा अभिनय त्या सोबत अतिशय हळुवार नी तरल उलगडत जाणारी, आणि अंतर्मनाला भावणारी, विचाराला उद्युक्त करणारी प्रेम कथा तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल.

ब्लॉग : चित्रपट परिक्षण – ’96 – तरल भावनेचा उत्कृष्ट आविष्कार Read More »