फोटोग्राफी : फुलपाखरू – भाग २
फोटोग्राफी : परिसरातील फुलपाखरू – भाग २
Butterfly Photography Part 2
फोटोग्राफी : फुलपाखरू – भाग २ Read More »
फोटोग्राफी : परिसरातील फुलपाखरू – भाग २
Butterfly Photography Part 2
फोटोग्राफी : फुलपाखरू – भाग २ Read More »
मागे पडलो…
जीवनाच्या शर्यतीत माणुसकीने वागलो
माणसा सोबत जगण्यात मागे पडलो
नात्यांचा जु खांद्यावर घट्ट ओढून धरलो
प्रवासात वाहत गेलो मागे पडलो
सुसंवाद नसताना शब्द धरून बसलो
ऐक्याला वाळवी लागली मागे पडलो
संघर्षाच्या वेळेस तत्व धरून बसलो
लढाईत जिंकून सुद्धा मागे पडलो
आप्तेष्टांना मित्रांना आपले म्हणून राहिलो
अपयशात माणुसकी निसटली मागे पडलो
कविता : मागे पडलो… Read More »
जागलेल्या आठवांचे माप घेणे सोडुनी दे
भूतकाळाच्या चुकांची मोजदादच खोडुनी दे
मैफिलीची गोड गीते वाटती ना आळवावी
पाश प्रीतीचे चुकीचे जोडलेले तोडुनी दे
धाडलेली प्रेम पत्रे फोल गेली फाडुनी दे
गाळलेल्या आसवांचे व्याज आता फेडुनी दे
शोधलेले शिंपले मोती मला दावू नको तू
खर्चलेले नेटके क्षण आपले मज जोखुनी दे
सोसल्या कडवट क्षणांची याद आता टाकुनी दे
छेडलेले बासरीचे सूर आता मोजुनी दे
पोळल्या गेल्या जिवाला आस तू दावू नको रे
बरसलेले पावसाळी चांगले क्षण त्यागुनी दे
सांडलेल्या आठवांना फक्त आता वेचुनी दे
मोरपंखी भावनांचे निबर जाळे तोडुनी दे
भावनांशी खेळणारे फास तू फेकू नको ना
चाललेले खेळ सारे एकदाचे मोडुनी दे
कविता: वाईट भूतकाळ सोडून दे Read More »
फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग ७
Common Bird MH Photography Part7
फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग ७ Read More »
माणसाने स्वप्न आणि प्रगती करण्याची इच्छा दर्शवणे आणि त्यासाठी संकल्प करणे आणि विशेष प्रयत्न करून तडीस नेणे ही उद्योजक बनण्याची पहिली पायरी आहे. मला आठवते तू प्रसिद्ध “येवले” चहा franchise साठी प्रयत्न केला होता. “The secret of getting ahead is getting started.” – Sally Berger सॅली यांनी म्हंटल्या प्रमाणे तू आता मित्रा सोबत उद्योजक होण्याचे पहिले पाऊल “मैत्री कट्टा हॉटेल” च्या उद्घाटनाने टाकत आहेस. तू जेव्हा “मैत्री कट्टा”ची माहिती देत होतास त्यावेळेस मला काहीही विशेष वाटले नाही. कारण मला माहिती होते, तुला उद्योग जगतात येण्याची तीव्र इच्छा काही स्वस्थ बसू देणार नाही. “येवले” नंतर तू या गोष्टी या पाठपुरावा करतच असशील आणि योग्य वेळ येता त्यातून सुसंधी निर्माण करत उद्योग जगताला जवळ करशील. आणि झालेही तसेच. आज ही त्यांना व्यवसाय करण्याची अनावर इच्छा आहे. यशस्वी होण्यासाठी लागणारे गुण जसे की गुणवत्ता, नियोजन, चिकाटी, जोखीम व्यवस्थापन, सुसंघटित पणा या तुझ्या मध्ये आधीच आहेत. फक्त त्याचा योग्य वेळी योग्य वापर झाला की अर्धी लढाई तू जिंकशील.
ब्लॉग – पत्र लेखन – अभिजीत – नवीन व्यवसाय Read More »
२०१४ साली मी अमृतसर ला अमरनाथ यात्रे निमित्त गेलो होतो. तिथे मी सुवर्ण मंदीरा सोबत जालियनवाला बाग स्मारका ला भेट दिली होती. तिथे मला इतिहासा मधील “जालियनवाला बाग” हत्याकांड आठवले. भिंतीत घुसलेल्या गोळ्या आणि त्या पाहून लोकांवर इंग्रजांनी काय, किती आणि कसे भयानक अत्याचार केले असतील त्याचे पुसट शी कल्पना येते. या हत्याकांडाच्या जखमेला इतिहासाच्या पानात बाजूला पडली आहे. या जखमेला भारतीयांनी कधीही पुरेसा न्याय दिलाच नाही. आणि स्मारक बघून आपण त्यातील शहीदांना आदरांजली न वाहता निघून जातो. पण “सरदार उधम” या चित्रपटाने या घटनेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
मला आधी वाटले की बॉलीवुडचा चित्रपट आहे मग त्यात मारधाड, त्वेषाने बोललेले संवाद, अपूर्ण माहिती, वाद विवाद, अति भडक मसाला, व्यक्तिरेखेला ला सुपर हीरो दाखवायचा अट्टाहास, असे काहीसे किंवा कमी जास्त प्रमाणात या सगळ्यांचे मिश्रण असा चित्रपट असेल. एखादी गोळी घ्यावी तसे चित्रपट पहिल्यावर हात आपटून केलेला जयजयकार. असे या चित्रपटात काही नाही. इतर देशभक्ती चित्रपटात जशी दाखवली तशी ट्रीटमेंट कथेला नाही.
ब्लॉग : चित्रपट परिक्षण – ‘सरदार उधम’ – उत्कृष्ट कलाकृती Read More »
फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग ५
Common Bird MH Photography Part5
फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग ६ Read More »
आपण छोटा का होईना प्रवास का करतो? तर प्रवास मध्ये गप्पा टप्पा, सुख दु:खाची चर्चा, विचारपूस, निसर्गाशी संवाद आणि मना वर आलेला मरगळ दूर करण्या साठी करतो. या वर्षी करोना लॉकडाऊन नंतर तिरूपती बालाजी दर्शन करण्याची कुटुंबाची बालाजी दर्शनाला जायची इच्छा होती. पण कोविड मुळे काही जाता येत नव्हते. त्यात मी महाराष्ट्रात, मंदिर आंध्रात आणि मध्ये कर्नाटक, तेलंगणा मधून रस्ता जास्त असल्याने शक्य नव्हते. कारण प्रत्येक राज्याचे वेगवेगळे नियम आणि कधी कोणता नियम अर्ध्या रात्रीत येईल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे कोविड मुळे दर्शन लांबत गेले. आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणल्या प्रमाणे जुलै महिन्यात दर्शन पास तर 5 मिनिटात संपले. इकडे आधार कार्डचा नंबर टाके पर्यंत तर तिकडे तिकिट सुद्धा संपले. हे तर गाजलेल्या मोबाइल फ्लॅश सेल सारखे तिकिटे 5 मिनिटात संपून जात होती. दुसर्या प्रकारची तिकिटे होती पण आपल्याला भेटतील याची काही खात्री नव्हती. त्यामुळे आम्ही तिकडे फिरकलोच नाही. २४ ऑगस्टला परत सप्टेंबर महिन्याचे तिकिटे ओपन झाली. आणि ६ जणांचे तिकिट काढे पर्यंत तर ५ मिनिटात संपले सुद्धा. पण बहुतेक कोणाचेही तिकिट न निघाल्या मुळे परत १० मिनिटात तिकिट ओपन झाली. त्यामुळे मी strategy बदलली. एकदाच सगळे तिकिटे काढण्या पेक्ष्या ३-३ लोकांचे तिकिट काढत गेलो आणि त्यातच पूर्ण दिवस गेला. त्यात यश (भाचा) आधार कार्ड नसल्याने त्याला एक ही दर्शन मिळाले नाही. त्या साठी परत पर्यायी दर्शन तिकिटाची व्यवस्था केली. मग त्यात आमचे दुसरे दर्शन, यशचे एक दर्शन यांचा ताळमेळ घालणे नाकी नऊ आले. पण त्याची सुद्धा तयारी झाली. आमचे दुसरे दर्शन तिकिटे सुद्धा लगेच मिळाली. पण यशचे आधार कार्ड काढून दर्शन तिकिट काढायला थोडा वेळ लागला. रेल्वे आणि राहायची सोय या नंतर तिकिट पुराण एकदाचे संपले. रेल्वे, दर्शन, निवास तिकिट काढणे वेळ खाऊ काम होते.
ब्लॉग : प्रवासवर्णन – तिरूपती बालाजी दर्शन ट्रीप – दीड दिवसीय ट्रीप Read More »
अब बता भी दो राज तुम्हारी कामयाबी काअब दोस्तो से क्या है छुपाना उलझने भी आपने ढेर सारी सही होगीक्या राज है उनका हल निकालना क्या आपने भी हारा हुआ खेल खेला हैक्या रहस्य है उनको भी हराना आखिर जिंदगी भी उस मोड पे गई होगीजहाँ से रास्ता मुश्किल था चुनना किसीं वक्त आंखो पर
हिंदी कविता : कामयाबी… Read More »
काही नाही
काही नाही ओंजळीत माझ्या काही नाही
शब्द नाही सूर नाही संगीतात राम नाही
पाऊस नाही श्रावण नाही मनात उत्साह नाही
चंद्र नाही सूर्य नाही आकाशात इंद्रधनुष्य नाही