फास्टर फेणे – परीक्षण – स्पॉयलर अलर्ट

आपण हॉलीवूडचे रहस्या वर आधारित चित्रपटा साठी जेम्स बॉड , शेरलाँक होम्सचे चित्रपट बघतो. पण मराठीत त्याच धर्तीवर आलेला चित्रपट बघायला विसरतो. मराठी चित्रपटा मध्ये नवीन-नवीन प्रयोग होत आहेत त्या मधलाच फास्टर फेणे हा उत्तम उदाहरण आहे. चित्रपट नाविन्यपूर्ण आहे यात वादच नाही. सगळ्या व्यक्तिरेखा स्पष्ट आणि ठळक आहेत. फेणे च्या विविध दृष्या मध्ये पार्श्वसंगीताचा सुरेख वापर केला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला अमेय वाघ आणि गिरीश कुलकर्णीचे नाव एकाच रेषेत मध्ये आहे हे बरेच काही सांगून जाते. भा. रा. भागवत यांनी लिहिलेली कथा नवीन रुपात रंगवली आहे. मा‍झ्या सारखे ज्यांनी कथा वाचली नाही त्यांना पूर्ण नवीन अनुभव आहे.

फास्टर फेणे – परीक्षण – स्पॉयलर अलर्ट Read More »

निवडक चारोळी

बाणाने पंख रक्तबंबाळ झाले
             म्हणून काय झाले….

शब्दाने हृदय विदीर्ण झाले
          म्हणून काय झाले….

प्रयत्नाला प्रचंड अपयश आले
             म्हणून काय झाले….

तत्व जागृत असतात तिथे हार नसते

निवडक चारोळी Read More »